मोदी-शाहांचं पुन्हा धक्कातंत्र! मध्य प्रदेशचे ‘हे’ नवे CM, शिवराज सिंह चौहानांचा पत्ता कट!
मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची कित्येक दिवसांपासून लोकांना उत्सुकता लागून राहिली होती. मात्र या सगळ्यावर आज पडदा पडला आहे. मोहन यादव यांच्या नावाची घोषणा करताच त्यांच्या समर्थकांना आनंदाचा पारा उरला नाही.

MP CM: गेल्या अनेक दिवसांपासून मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदाची (Madhya Pradesh Chief Minister) माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र आज त्या गोष्टीवर पडदा पडला आहे. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मोहन यादव यांच्या नावावर एकमत झाल्यानंतर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ज्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकण्यात आली आहे ते मोहन यादव हे उज्जैन दक्षिणचे आमदार (MLA from Ujjain South) आहेत. मोहन यादव (Mohan Yadav) हे संघाच्याही जवळचे असल्याचे सांगितले जात आहे.
चर्चा थांबल्या
विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत शिवराज सिंह चौहान यांनी मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. या झालेल्या घोषणेमुळे होत असलेल्या चर्चा थांबल्या आहेत. यादव यांच्या नावाची घोषणा होताच आता राज्याची कमान ही मोहन यादव यांच्याकडे असणार हे आता पक्कं झाले आहे.
हे ही वाचा >> Uddhav Thackeray : ‘मुख्यमंत्र्यांनी स्वच्छतेची सुरुवात सहकाऱ्यांपासून करावी’, ठाकरेंचा सणसणीत टोला
हायकमांडचे आदेश
मध्य प्रदेशमधील या महत्त्वाच्या निर्णयापूर्वी भाजप हायकमांडने आज त्यांच्या निरीक्षकांचे पथक भोपाळला पाठवले होते. यामध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, आशा लाक्रा आणि के लक्ष्मण यांचा त्यामध्ये समावेश होता. निरीक्षकांचे पथक भोपाळला पोहोचल्यानंतर मनोहरलाल खट्टर आणि इतर निरीक्षक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी सर्वप्रथम शिवराज सिंह यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना भाजप हायकमांडने दिलेल्या आदेशही सांगण्यात आला. यावेळी त्यांना सांगण्यात आले की, खट्टर आणि इतर निरीक्षक हे हायकमांडच्या आदेशानुसारच दिल्लीहून आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खट्टर भोपाळला पोहोचल्यानंतरही नड्डा हे सतत त्यांच्या संपर्कात होते.
बैठक सुरू होताच घोषणा
पक्ष कार्यालयात विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू झाल्यानंतर प्रल्हाद पटेल आणि शिवराज सिंह चौहान यांच्या समर्थकांनी कार्यालयाबाहेरच जोरदार घोषणा देते होते. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह ज्योतिरादित्य सिंधिया, नरेंद्र सिंह तोमर, कैलाश विजयवर्गीय, प्रल्हाद पटेल आणि व्हीडी शर्मा ही नावंही सीएम पदासाठी चर्चेत होती. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याआधी प्रल्हाद पटेल यांच्या निवासस्थानावर जोरदार सुरक्षा वाढवण्यात आली होती.