BJP: ‘…तर यापुढेही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील’, चंद्रशेखर बावनकुळेंचं भुवया उंचावणारं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

bjp state president chandrasekhar bawankule said if our central committee say then eknath shinde will continue to be chief minister eyebrow raising statement
bjp state president chandrasekhar bawankule said if our central committee say then eknath shinde will continue to be chief minister eyebrow raising statement
social share
google news

Chandrasekhar Bawankule: दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: ‘प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. भाजपच्या नेत्यांना वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत. आमच्या केंद्रीय समितीने जर सांगितले की पुढेही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री राहतील तर आम्हाला काम करावे लागेल.’ असं भुवया उंचावणारं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. (bjp state president chandrasekhar bawankule said if our central committee say then eknath shinde will continue to be chief minister eyebrow raising statement)

पाहा चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले.

‘महाराष्ट्रातल्या सर्वसाधारण, सर्वच बुथवरच्या आमच्या तीस हजार लोकांची जी टीम आहे.. जे सुपर वॉरिअर आम्ही तयार केले आहेत, 35 लाख कार्यकर्ते हे आमच्याकडे डेटा सेंटरला काम करतात. आमच्यासोबत जोडले गेले आहेत राज्यात.’

‘आज 35 लाख कार्यकर्त्यांचा डेटा.. जो रोज व्यक्त होणारा डेटा आहे.. शेवटी सर्वांना भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना वाटतंय की, देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘अजित पवारांकडे जे मानणारे आहे, जे आमदार आहेत त्यांना वाटतं की, अजितदादा मुख्यमंत्री व्हावं. एकनाथ शिंदे यांच्या लोकांना वाटतं की, तेच मुख्यमंत्री असावेत. हे काही गैर नाही.’

हे ही वाचा >> “अजित पवार ज्यांच्या उरावर…”, उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या वर्मावर ‘बाण’

‘काँग्रेसमध्ये तर प्रत्येक जिल्ह्याला एक मुख्यमंत्री वाटतो त्यामुळे त्यांच्याकडे पंधरा एक मुख्यमंत्री तयार झाले आहेत.’

ADVERTISEMENT

‘देवेंद्रजी ठीक आहे.. त्यांनी ते मान्य केलं किंवा काय ते बोलले असतील. मला काही त्याबाबत फार माहिती नाही. पण भाजपच्या कार्यकर्त्याला असं वाटतं की, देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत. पण परिस्थितीनुसार निर्णय होत असतात. शेवटी आमचं केंद्रीय संसदीय मंडळ आणि आमचे तीनही नेते राज्याचे हे बसून जो निर्णय करतील तो अंतिम आहे. त्याला मान्यता असणारच आहे आमची.’

ADVERTISEMENT

‘पण व्यक्त होण्यात आणि मांडण्यात काही हरकत नाही. पण आमच्या केंद्रीय समितीने जर सांगितले की पुढेही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील तर आम्हाला काम करावे लागेल.’ असं चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलणार? फडणवीसांचं थेट उत्तर; म्हणाले…

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये (India Today conclave) राज्याच्या कारणावर बोलत असताना मुख्यमंत्री कोण असणार यावर उत्तरही दिलं होतं.

हे ही वाचा >> NCP Crisis : अजित पवारांनी थोपटले दंड, शरद पवार ECI च्या कोर्टात, काय झालं?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये मुख्यमंत्री पदाविषयी आणि भविष्यातील निवडणुकांचे नेमके ध्येय धोरण काय हे सांगताना त्यांनी राज्यातील युती सरकारबाबतही अनेक गोष्टी दिलखुलासपणे सांगितल्या. यावेळी त्यांनी राज्यातील राजकारणावर बोलताना मुख्यमंत्री पदाचा दावेदार आणि त्या पदासाठी अजित पवारांच्या चर्चेत असलेल्या नावावरून त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, सध्या राज्याचा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य दिशेने वाटचाल चालू आहे. त्यामुळे सहा महिन्यात मुख्यमंत्री बदलणार हा चाललेल्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकीय वर्तुळात सध्या मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु असली तरी त्याबाबत सध्या कोणताही निर्णय होणार नाही. कारण राजकारणात सहा महिन्यात असा कोणताही सहज बदल होत नाही. त्यामुळे आगामी काळातील कोणत्याही निवडणुका असल्या तरी त्या निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT