Budget 2025 LIVE: 'त्या' मोठ्या घोषणेमुळे Middle Class होणार मालामाल!
FM Nirmala Sitharaman: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज (1 फेब्रुवारी) देशाचं अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीयांना बऱ्याच आशा आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडला 2025-26 साठी अर्थसंकल्पाच्या
भाषणाच्या सुरुवातीला विरोधकांची जोरदार घोषणाबाजी
अर्थसंकल्पाकडून मध्यमवर्गीयांना बऱ्याच आशा
Budget Updates: नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज (1 फेब्रुवारी) देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करत आहेत. विरोधकांच्या घोषणाबाजीमध्येच त्यांना अर्थसंकल्प सादर करावा लागत आहे. त्या आज सलग आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या काळात काही विशेष घोषणा अपेक्षित आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कॅबिनेट सहकाऱ्यांना सांगितले की, हे बजेट सामान्य माणसासाठी आहे. हे गरीब शेतकरी, महिला आणि तरुणांच्या आकांक्षांचे बजेट आहे. हे ज्ञानाचे बजेट आहे.
अर्थसंकल्पातील मुख्य मुद्दे वाचण्यासाठी या पेजशी कनेक्ट रहा:-
LIVE- बजेटमधील महत्त्वाचे मुद्दे
- 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही.
या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. आता वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही.
- सर्वसाधारण अर्थसंकल्पात डीप टेक फंडची घोषणा










