Anil Deshmukh : अनिल देशमुख पुन्हा तुरुंगात जाणार? CBI कडून गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

योगेश पांडे

ADVERTISEMENT

cbi case file against anil deshmukh in case of girish mahajan deshmukh thanks devendra fadnavion x social media  account
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार

point

अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल

point

अनिल देशमुख यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागणार?

Anil Deshmukh News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे  ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण सीबीआयकडून (CBI) अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  त्यामुळे अनिल देशमुख यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागण्याची शक्यता आहेत. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी ट्वीट करून देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) आभार मानले आहेत. तसेच राजकारण किती खालच्या पातळीला गेलं आहे, असे देखील देशमुख यांनी म्हटले आहे. दरम्यान नेमकं देशमुख यांच्यावरती कोणत्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे? हे जाणून घेऊयात. (cbi case file against anil deshmukh in case of girish mahajan deshmukh thanks devendra fadnavion x social media)  account

ADVERTISEMENT

अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपदाच्या काळात भाजप नेते गिरीश महाजन यांना अटक करण्यासाठी जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे. सीबीआयने याच प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान याआधी कथित 100 कोटी वसूलीच्या चौकशीचा ससेमिरा अनिल देशमुखांच्या मागे आहे. या प्रकरणी त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. त्यानंतर आता जळगावच्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : Sharad Pawar भाजपला आणखी मोठा धक्का देणार?, घाटगेंपाठोपाठ 'हा' नेता घेणार हातात तुतारी?

दरम्यान हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी ट्विट करून देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले आहे. नेमकं देशमुख ट्विटमध्ये काय म्हणाले आहेत? हे जाणून घेऊयात.

हे वाचलं का?

देशमुखांचं ट्विट जशाचं तसं 

धन्यवाद...
 देवेंद्रजी फडणवीस

आज माझ्यावर #CBI कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता - न डगमगता मी #BJP च्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana Date Extended 2024: आता 'ही' आहे अर्जाची शेवटची तारीख, मिळणार थेट 4500 रुपये..

महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे 

ADVERTISEMENT

गिरीश महाजन यांचा आरोप काय? 

 दरम्यान या प्रकरणी काही दिवसांपूर्वीच गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकार असताना त्यांना मोक्का अंतर्गत अटक करण्यासाठी अनिल देशमुख यांनी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता असा गंभीर आरोप केला होता. तसेच हा संपूर्ण प्रकार प्रवीण मुंडे यांनीच माझ्या लक्षात आणून दिल्यानंतर मी या संदर्भात अनिल देशमुख यांना जाब विचारला होता असे देखील गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं. याप्रकरणी नुकतच सीबीआयकडून चौकशी करण्यात आली असून आता अनिल देशमुख यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT