Satya Pal Malik: पुलवामा हल्ल्यावरून PM मोदींना खिंडीत गाठणाऱ्या माजी राज्यपालांना CBI चं समन्स

मुंबई तक

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने तोंडी समन्स बजावले आहे. त्यांना 27 आणि 28 एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. स्वत: मलिक यांनी याबाबत माहिती दिली.

ADVERTISEMENT

cbi summons former governor satya pal malik who criticized pm modi over pulwama attack
cbi summons former governor satya pal malik who criticized pm modi over pulwama attack
social share
google news

जम्मू-काश्मीर: सीबीआयने जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना समन्स बजावले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल असताना त्यांना 300 कोटी रुपयांची लाच देण्याचं आमिष दाखविण्यात आलं होतं. याचीच आता सीबीआयकडून चौकशी करण्यात येणार आहे. (cbi summons former governor satya pal malik who criticized pm modi over pulwama attack)

सत्यपाल मलिक यांनी इंडिया टुडे/आज तकला सांगितले की, सीबीआयने त्यांना हजर राहण्यास सांगितले आहे. ‘भ्रष्टाचाराच्या या प्रकरणी त्यांना माझ्याकडून काही गोष्टींवर स्पष्टीकरण हवे आहे. त्यांनी मला माझ्या सोयीनुसार 27 आणि 28 एप्रिल रोजी हजर राहण्यास तोंडी सांगितले आहे.’ मात्र, अद्यापपर्यंत सीबीआयने सत्यपाल मलिक यांच्या या दाव्याला दुजोरा दिलेला नाही.

रिलायन्स इन्शुरन्स प्रकरणी सत्यपाल मलिक यांना सीबीआयने समन्स बजावल्याची बातमी समोर आल्यानंतर काँग्रेसने ट्विट केले की, ‘शेवटी पंतप्रधान मोदींसोबत राहावलं नाहीच. सत्यपाल मलिक यांनी देशासमोर त्यांचं पितळ उघडं पाडलं. आता सीबीआयने मलिक यांना बोलावले आहे. हे तर होणारच होतं.’

हे वाचलं का?

    follow whatsapp