Chhagan Bhujbal : 'शरद पवारांचे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेत', भुजबळांच्या विधानाने खळबळ

ADVERTISEMENT

शरद पवार आणि छगन भुजबळ.
शरद पवार यांच्यावर छगन भुजबळ यांनी गंभीर आरोप केले आहेत.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांचे मोठे विधान

point

छगन भुजबळ म्हणाले की, शरद पवार पाठीमागे राहून महाराष्ट्र पेटवत आहेत

point

भुजबळ बारामतीतील सभेत काय बोलले?

Chhagan Bhujbal Sharad Pawar : (वसंत मोरे, बारामती) "पाच वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी बहिष्कार टाकला", असे सांगत छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप केला आहे. बारामतीमध्ये जनसन्मान रॅली आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात बोलताना भुजबळांनी शरद पवारांना लक्ष्य केले. (Chhagan Bhujbal made serious allegations against Sharad Pawar on the issue of Maratha and OBC reservation)

ADVERTISEMENT

छगन भुजबळ म्हणाले की, "आरक्षणाचं भांडण मिटवावं म्हणून चार दिवसांपूर्वी सह्याद्री अतिथीगृहात सरकारनं मीटिंग बोलावली. सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी तिथे यावं. मार्गदर्शन करावं की, हे सगळं प्रकरण शांत कसं होईल. सगळ्यांना न्याय कसा मिळेल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे."

"आता हे जेव्हा कळलं... आम्ही तर जाणारच होतो. परंतू विरोधी पक्षांचे जे नेते आहेत, त्यांनी सुद्धा येणं क्रमप्राप्त. मी स्वतः वडेट्टीवारांना सांगितलं की, तुम्ही पण या. कायदा काय सांगतो, याबद्दल वेगवेगळ्या महाधिवक्त्यांनी काय सांगितलं आहे, त्याच्या प्रती त्यांना दिल्या."

हे वाचलं का?

काही करा शरद पवारांना सुद्धा बोलवून घ्या -भुजबळ

भुजबळ सभेत बोलताना म्हणाले, "मी जितेंद्र आव्हाडांसुद्धा बोललो. त्यांना सुद्धा कायद्याच्या काही प्रती दिल्या आणि त्यांना सांगितलं की, काही करा, शरद पवारांना सुद्धा बोलवून घ्या. कारण व्ही.पी. सिंगांनी जे आरक्षण दिलं. त्या आरक्षणाची अंमलबजावणी पवार साहेबांनी केली म्हणून आम्ही आतापर्यंत त्यांचा जय जयकार केला. त्यांचे आभार सुद्धा मानले."

हेही वाचा >> "माझी पक्षातून हकालपट्टी करा, पण आधी...", आमदार खोसकर संतापले

छगन भुजबळ म्हणाले, पाच वाजता बारामतीवरून फोन आला अन्...

"ज्यावेळी आरक्षणाच्या बाबतीत काही प्रश्न निर्माण होतात, त्यावेळी  अपेक्षा ही आहे की, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होते. परंतू असं सांगितलं जातं की, सगळे येणार होते, पण पाच वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणाऱ्या नेत्यांनी बहिष्कार टाकला", असे गंभीर विधान भुजबळ यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> क्रॉस व्होटिंग करणारे काँग्रेसचे 'ते' आठ आमदार कोण?

याच मुद्द्यावर भुजबळ पुढे म्हणाले की, "मला हे विचारायचं आहे की, या बारामती मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे मतदार आहेत. माळी समाजाचे आहेत. धनगर समाजाचे आहेत. सर्व ओबीसी, भटक्या समाजाचे आहेत. सगळ्यांनी मते दिली. जशी सुनेत्रा पवारांना दिली असतील, तशी ती सुप्रिया सुळेंनाही दिली असतील. मग या सगळ्याच्या बाबतीत, त्या सगळ्यांचं संरक्षण करणे हे तुमचे काम नाही का?", असा सवाल भुजबळांनी शरद पवारांना केला. 

ADVERTISEMENT

तुमचं काय घोडं मारलं आहे?

"तुमचा राग आमच्यावर असेल, तुमचा राग अजितदादावर असेल, तुमचा राग छगन भुजबळवर असेल, पण या ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलं आहे? का तुम्ही येत नाही? का हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर येत नाही? सगळ्यांना सांगायचं आणि मग पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून हे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चालले आहेत", असे म्हणत छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर नामोल्लेख न करता गंभीर आरोप केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT