Shinde: हजारो शिवसैनिकांसमोर श्रीकांत शिंदेचा कंठ दाटला, CM शिंदेही झाले भावूक; नेमकं घडलं काय?
कोल्हापूर येथे शिवसेनेचे दोन दिवसीय महाअधिवेशन सुरू असताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी बोलताना 'मला अभिमान आहे माझ्या बापाचा, ज्या बापानं सर्व शिवसैनिकांना आपलं कुटुंब मानलं' असं म्हणत केलेल्या भाषणामुळे मुख्यमंत्री भावूक झाल्याचे दिसून आले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

श्रीकांत शिंदेचा कंठ दाटला, CM शिंदेही झाले भावूक!

'मला अभिमान आहे माझ्या बापाचा'

सामान्य शिवसैनिकांना बापानं कुटुंब मानलं
Eknath Shinde: राज्यातील राजकारणात मोठ मोठ्या घटना घडत असतानाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचे कोल्हापूरातील भाषण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आपल्या भाषणात ठाकरे कुटुंबीयांवर टीका करताना, एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे समर्थन करत, 'मला अभिमान आहे माझ्या बापाचा, ज्या बापानं सर्व शिवसैनिकांना आपलं कुटुंब मानलं, तो साधारण शिवसैनिक आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला' म्हणत भावूक झाले. यावेळी एकनाथ शिंदेही भावूक झाल्याने आज त्यांच्या भाषणाची प्रचंड चर्चा झाली.
आजचा दिवस महत्वाचा
खासदार श्रीकांत शिंदे यांनी बोलताना ठाकरे कुटुंबीयांवर टीका करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंड का केले आणि केले त्यामुळे राज्यातील सामान्य शिवसैनिकांना आजचा दिवस पाहता आलं असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
शिवसैनिकांना कुटुंब मानलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी बोलताना त्यांनी मागील संदर्भ देत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे माझा बाप मुख्यमंत्री झाला हे ही त्यांनी अधोरेखित केले. यावेळी त्यांनी सांगितले की, 'ज्या बापानं सर्व शिवसैनिकांना आपलं कुटुंब मानलं, तो साधारण शिवसैनिक आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला' मात्र तरीही त्यांच्यावर टीका करताना ठाकरे कुटुंबाचे नाव न घेता, वारंवार सांगितलं की, जातं की माझा बाप चोरला, माझा बाप चोरला हे रोज सांगितले जातं असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
कोल्हापूर येथे शिवसेनेचे दोन दिवसीय महाअधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली. यावेळी मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांसमक्ष आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांसमोर व्यक्त केलेल्या भावना आणि हे क्षण कायम… pic.twitter.com/Gjf93UQGkB