‘लबाड लांडग्यांने वाघाचे कातडे पांघरले म्हणजे तो…’, शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

ADVERTISEMENT

Chief Minister Eknath Shinde's criticism of Uddhav Thackeray speech in Nashik
Chief Minister Eknath Shinde's criticism of Uddhav Thackeray speech in Nashik
social share
google news

Eknath Sjinde: शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाशिक दौऱ्यावर असताना भाजपसह (BJP) राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. शिवसेनेतून फुटून वेगळा गट स्थापन करणाऱ्या शिंदे गटावरही त्यांनी सडकून टीका केली होती. त्यांच्या त्या भाषणावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता पलटवार करत उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या नेत्यांवर टीका करत लबाड लांडग्यांने वाघाचे कातडे पांघरले म्हणजे तो वाघ होत नाही, म्हणत त्यासाठी वाघाचे काळीज लागते. वाघ एकच तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असा जोरदार पलटवारही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

बाळासाहेब होता येत नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी बाळासाहेबांची आठवण काढत वाघ एकच होते, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे होते असं सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी त्यांच्या भगवे कपडे आणि रुद्राक्षांच्या माळावरूनही त्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. बाळासाहेबांसारखे भगवे कपडे आणि रुद्राक्षांच्या माळा घातल्या म्हणजे कुणाला बाळासाहेब होता येणार नाही. त्यासाठी बाळासाहेबांसारखे प्रखर विचार असावे लागतात अशी खोचकपणे त्यांनी त्यांना टोला लगावला होता.

हे ही वाचा >> ‘BJP म्हणजे भेकड जनता पार्टी’, ठाकरेंचा केंद्रावर घणाघात

काँग्रेसच्या ताटाखालील मांजर

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांनी महाराष्ट्रातून एक एक गोष्ट पळवली जात आहे. तरीही आम्हीच खरे बाळासाहेबांचे वारसदार आणि आमचीच खरी शिवसेना अशी खोचक टीका त्यांनी एकनाथ शिंदेंवर केली होती. मात्र त्या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे यावेळी एकनाथ शिंदे यांनी मात्र त्यांच्यावर टीका करताना म्हटले की, काँग्रेसच्या ताटाखालील मांजर होऊन सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी मिंधेपणा करणारे सर्वात मोठे मिंधे कोण..? असा सवाल करत ये पब्लिक है सब जानती है! असं म्हणत त्यांच्या भाषणाचा त्यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भाजप-ठाकरे वाद

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या दौऱ्यात एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला  होता. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांनी मोदींचे महाराष्ट्र दौरे का वाढले हेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी ते म्हणाले की, कारण लोकसभेच्या 48 जागा महाराष्ट्रात आहेत, मात्र मणिपूरमध्ये दोनच जागा असल्याने तिथे हिंसाचार होऊनही ते तिथे गेले नाहीत, त्यावरूनही आता जोरदार भाजप-ठाकरे गट युद्ध रंगणार असल्याचे चिन्हं दिसत आहे.

हे ही वाचा >> ‘PM मोदींसारखे ढोंगी आणि खोटारडे नेते या देशात..’, संजय राऊतांची जहरी टीका

    follow whatsapp

    ADVERTISEMENT