‘ज्यांनी बाळासाहेबांना आयुष्यभर…’, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

maharashtra politics : cm eknath shinde recites to uddhav thackeray after thackeray faction alliance with samajwadi parties.
maharashtra politics : cm eknath shinde recites to uddhav thackeray after thackeray faction alliance with samajwadi parties.
social share
google news

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना, कार्यपद्धतीला ज्यांनी आयुष्यभर विरोध केला, त्यांना सतत अपमानित केले; त्यांनाच मांडीवर घेण्याचे पाप उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे करत आहेत. ज्याप्रमाणे अन्नात भेसळ होते, त्याप्रमाणे हिंदुत्वात मिलावट करण्याचा प्रयत्न होतोय”, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला.

ADVERTISEMENT

शिवसेनेचे (उबाठा) नेते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित समाजवादी परिवाराच्या २१ संघटनांची बैठक झाली. या बैठकीत ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला. याबद्दल पत्रकारांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विचारले असता त्यांनी यावर भाष्य करताना उद्धव ठाकरेंवर बाण डागले.

ठाकरे-समाजवादी एकत्र… एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काल 40 वर्षांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक मुंबईत पार पडली. 2036 सालची ऑलिम्पिक स्पर्धा देशात आयोजित करायचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मात्र असं असूनही उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केल्याशिवाय दिवस गोड जात नाही. हिंदुत्वाला तिलांजली देऊन उद्धव यांनी जेव्हा काँग्रेस पक्षाला मांडीवर घेतले तेव्हाच त्यांचं बेगडी हिंदुत्व लोकांना समजले होते. त्यांचा हा मुखवटा आगामी लोकसभा निवडणुकीत जनताच दूर केल्याशिवाय राहणार नाही”, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली.

हे वाचलं का?

हेही वाचा >> शरद पवारांच्या निकटवर्तीय माजी खासदारावर EDची मोठी कारवाई, 315 कोटींची संपत्ती जप्त

“सत्तेसाठी एकत्र आलेले हे सारे पक्ष याआधी 2014 आणि 2019 साली देखील एकत्र आले होते आणि त्यासाठीच ते पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व ज्यांनी सोडले, सत्तेच्या लालसेसाठी हिंदुत्वाचा विचाराला मतदान करूनही मतदारांचा विश्वसघात करून ज्यांनी असंगाशी संग केला. त्यांना आता जनताच त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”, असे विधान शिंदेंनी केले.

“ज्याप्रमाणे अन्नात भेसळ होते, त्याप्रमाणे हे सगळे पक्ष एकत्रित घेणे म्हणजे हिंदुत्वात मिलावट करण्याचा प्रयत्न आहे. हिंदुत्वाचे हे नकली मुखवटे आगामी निवडणुकीत जनता फाडेल आणि यांना यांची जागा नक्की दाखवेल”, असा इशारा एकनाथ शिंदेंनी यावेळी दिला.

उद्धव ठाकरेंना टोला

“घरी बसून काम करणाऱ्यांना लोकं मत देत नाहीत. जो लोकांमध्ये मिसळून त्यांची कामे करतो त्यालाच लोकं मतं देतात. त्यामुळे या सर्वांनी एकत्र येऊन कितीही प्रयत्न केले तरीही 2024 साली पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीच बहुमताने निवडून येतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे”, असा टोला शिंदेंनी ठाकरेंना लगावला.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> खरी राष्ट्रवादी कोण, याचा निकाल तुमच्या बाजूने होईल; सुनावणीआधी शरद पवारांचं विधान

“ज्या काँग्रेसला गाडण्याची भाषा स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केली त्याना मांडीवर घेणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाहीत एवढंच नाही तर खुद्द बाळासाहेब ठाकरे देखील त्यांना कधी माफ करणार नाहीत”, असं शिंदे म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT