‘राजीनामा कसा देतात, हे आम्ही…’, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या वृत्तावर सामंत काय बोलले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

cm eknath shinde resignation speculation uday samant reaction
cm eknath shinde resignation speculation uday samant reaction
social share
google news

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांनी (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री आणि इतर 8 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.या शपथविधीनंतर शिंदे गटात अस्वस्थता असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राजीनामा देणार असल्याची चर्चा होती.या चर्चेवर आता उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही राजीनामे घेणारे आहोत, 12 महिन्यापूर्वी कशाप्रकारे राजीनामा दिला जातो, हे एकनाथ शिंदे यांनी उठाव करून दाखवून दिले आहे, असे विधान करून उदय सामंत यांनी केले आहे. (cm eknath shinde resignation speculation uday samant reaction)

ADVERTISEMENT

उदय सामंत (Uday Samant) यांची बाळासाहेब भवनतात पत्रकार परिषद पार पडली आहे.या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. साद दिली तर प्रतिसाद देऊ असे विधान शंभुराज देसाई यांनी बुधवारी केले होते. या विधानानंतर शिंदे गट शिवसेनेते पुन्हा प्रवेश करेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.या उदय सामंत म्हणाले की,12 महिन्यापुर्वी जो उठाव झाला त्यानंतर परत जाण्याचा प्रश्नच येत नाही,असे स्पष्ट सांगितले आहे.आम्ही आता कुठे जाणार?, आमच्याबरोबर कोण येणार? अशा बाबतीत तिथे परत जाण्याचा कुठेही पॉईंट नॉट नॉट परसेंट शुन्य टक्के विचार नाही. तसेच परत सोबत कोणाला घ्यायचे, ज्या ठिकाणाहून आपण एका वेगळ्या विचाराने बाहेर पडलो, त्या ठिकाणी परत येण्याचा संबंधच नाही, असे देखील सामंत म्हणाले आहेत.

हे ही वाचा : ‘आव्हाडांसह 2-3 जण प्रफुल्ल पटेलांवर तुटून पडले’, भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी

एकनाथ शिंदेचे नेतृत्व हे संयमी आहे. सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारे आहे. त्यामुळे काही लोकांना त्यांच्यावर काही बोललं तरी चालतं, अशाप्रकारची यंत्रणा तयार करण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ, पण अशा प्रकारचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाही, असे देखील उदय सामंत म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

मुख्यमंत्र्यांच्या राजीनामा दिला जाणार आहे. हे पेरलं जातंय, हे पसरवलं जातंय असे देखील उदय सामंत म्हणाले आहेत. भाकरीचा जो विषय आहे.त्याच्यामध्ये स्वाभाविक आहे, त्यांनी भाकरीचा उदाहरण दिलं. एक भाकरी जी मिळणार आहे, त्यातली अर्धी मिळणार आहे, याचा अर्थ जेवताना भाकरीमध्ये वाटेकरी निर्माण झाले आहेत.याच्यापलिकडे भरत गोगावले काही बोलले नाही आहेत, असे देखील सामंत म्हणाले आहेत.

हे ही वाचा : 30 जून! अजित पवारांच्या ‘या’ बैठकीतच झाला शरद पवारांना धक्का देण्याचा प्लॅन

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT