‘मोदी देवाचा मुद्दा घेऊन तुमच्यासमोर…’, मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधानांचे काढले वाभाडे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Congress president Mallikarjun Kharge criticizes Prime Minister Narendra Modi on the issue of Ram temple
Congress president Mallikarjun Kharge criticizes Prime Minister Narendra Modi on the issue of Ram temple
social share
google news

Congress : काँग्रेसच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून काँग्रेसने नागपुरात (Nagpur) आज महासभेचं आयोजन केले होते. या महासभेसाठी देशातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते हजर होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार हल्लाबोल केला. राम मंदिराच्या (Ram Mandir) मुद्यासह मल्लिकार्जुन खरगे यांनी बेरोजगारी, महागाई हे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून नरेंद्र मोदी आता देवाचा मुद्दा घेऊन तुमच्यासमोर येतील आणि त्याची भूल तुम्हाला पाडतील म्हणत त्यांनी मोदींवर जोरदार निशाणा साधला.

लोकशाहीला वाचवा

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना म्हणाले की, आता मोदी देवाचा मुद्दा घेऊन ते तुमच्यासमोर येतील. मात्र त्यापेक्षा देशात अनेक समस्येच्या गर्ते माणसं सापडली आहेत. त्यामुळे देशाला वाचवण्यासाठी संविधान आणि लोकशाहीला वाचवायचे असेल तर तुम्ही इंडिया आघाडीला मत द्या असंही आवाहन त्यांनी यावेळी केले.

हे ही वाचा >> Rahul Gandhi : ‘मोदींना प्रश्न आवडला नाही अन् नाना पटोले आऊट’; राहुल गांधींचा घणाघाती हल्ला

संसदेत जात नाहीत

मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारा अनेकांचे बळी गेले. महिलांवर अत्याचार झाले, लहान बालकांचा मृत्यू झाला. या दुर्घटना बघायला मोदींना वेळ नाही मात्र डायमंड व्यापाऱ्याचे उद्घाटन करण्यासाठी ते धावून जातील अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
देशाचे अधिवेशन सुरु असताना नरेंद्र मोदी संसदेत न जाता ते बाहेर फिरत राहतात, मात्र संसदेत जात नाहीत. मात्र आम्हाला अधिवेशनाच्या वेळी देशातील नागरिकांचे प्रश्न महत्वाचे वाटत असतात त्यासाठीच आम्ही संसदेत जातो. नरेंद्र मोदींना संसदेची घृणा असल्यामुळेच ते संसदेत जात नसल्याचाही त्यांनी गंभीर आरोप केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

खासदारासाठी निलंबन

संसदेत ज्या तरुणांनी घुसखोरी केली, त्यावर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. मात्र त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देणे अपेक्षित होते. मात्र ज्या भाजप खासदाराच्या पासवर घुसखोरी करण्यात आली त्या भाजपच्या एका खासदाराला वाचविण्यासाठीच विरोधी पक्षातील 146 खासदारांचं निलंबन करण्यात आल्याचाही त्यांनी मोदी सरकारवर आरोप केला. अधिवेशन सुरु असताना लोक आत घुसलेच कसे असा सवालही त्यांनी नागपुरच्या महासभेतून केला आहे.

खोटं बोलणारा माणूस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच कोट्यवधी रुपयांचे कर्जही झाले आहे. त्यामुळे आता जनेतेने मोदींना धडा शिकवण्याची गरज असल्याचे सांगत नरेंद्र मोदींसारखा खोटं बोलणारा माणूस तुम्हाला कुठंच मिळणार नाही असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. देशात अनेक समस्या असतानाही त्या न सोडवता नको त्या मुद्यावर लोकांना गुंतवून ठेवण्यातच मोदींचे राजकारण चालले असल्याची टीकाही त्यांनी केली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> सकाळी सकाळी चहा मागितला, संतापलेल्या बायकोने डोळ्यातच खुपसली कैची

    follow whatsapp

    ADVERTISEMENT