Devendra Fadnavis : ''महाविकास आघाडीच्या नेत्यांची औकात...'', विरोधकांवर फडणवीस भडकले!
Devendra Fadnavis News : देवेंद्र फडणवीस यांना जोपर्यंत आपण घेरत नाही तोपर्यंत आपण जिंकू शकत नाही असं विरोधकांना वाटत. पण कितीही चक्रव्यूह करा आम्ही भेदुन दाखवू, असा इशारा देखील फडणवीसांनी विरोधकांना दिला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
तुम्ही कितीही चक्रव्यूह करा आम्ही भेदुन दाखवू
महाविकास आघाडी नेत्यांची औकात नव्हती,
विचारवंताची टोळी तयार करून खोट पसरवलं
Devendra Fadnavis News : आगामी विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येतेय, तसं तसं वातावरण तापताना दिसत आहे. त्यात सर्वच पक्षाकडून मेळाव्यांचे आणि बैठकीचे आयोजन करून वातावरण निर्मितीला वेग आणला जातोय. अशात आता देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची औकात नव्हती म्हणूनच त्यांनी विचारवंताची टोळी तयार करून खोट नरेटिव्ह पसरवल्याची टीका केली. (devendra fadnavis criticize maha vikas aghadi assembly election fake narrative lok sabha election maharashtra politics)
ADVERTISEMENT
नागपुर ग्रामीण भाजप कार्यकारिणी बैठकीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पॉलिटिकल अर्थमॅटिक भाजपच्या विरोधात गेल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीस यांना जोपर्यंत आपण घेरत नाही तोपर्यंत आपण जिंकू शकत नाही असं विरोधकांना वाटत. पण कितीही चक्रव्यूह करा आम्ही भेदुन दाखवू, असा इशारा देखील फडणवीसांनी विरोधकांना दिला.
हे ही वाचा : Gold Rate : खरंच इतकं स्वस्त झालंय सोनं, आजचा भाव काय?
राज्यात आपली लढाई महाविकास आघाडी सोबत नव्हती तर फेक नरेटिव्ह सोबत होती. महाविकास आघाडी नेत्यांची औकात नव्हती, म्हणून त्यांनी तथाकथित विचारवंताची टोळी तयार करून खोट पसरवलं. दलित, अल्पसंख्याक, शेतकरी यांच्यात खोटे नरेटिव्ह पसरवण्यात आले, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली. तसेच आता फेक नरेटिव्हचं उत्तर थेट नरेटिव्हने देणार, असा इशारा देखील फडणवीसांनी यावेळी दिला.
हे वाचलं का?
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लाडक्या बहिणींना देखील शब्द दिला. लाडक्या बहिणींना जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण करणारच, असे आश्वासन फडणवीसांनी महिलांना दिले. त्याचसोबत गेल्या 60 वर्षात काँग्रेस ला जे करता आलं नाही ते आम्ही 10 वर्षात करून दाखवलं. नागपुरचा विकास बघा, असे दखील फडणवीसांनी सांगितलं.
हे ही वाचा : Mumbai Crime : मुलाच्या फ्लाईटचं तिकिट काढलं अन्...,पेडणेकर दाम्पत्याचा भयानक शेवट!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT