Devendra Fadnavis : '40 वर्षानंतर शरद पवार रायगडावर, हे तर अजितदादांचं...', देवेंद्र फडणवीसांनी डिवचलं

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

 '40 वर्षानंतर शरद पवार रायगडावर गेले, हे अजित दादांचे क्रेडिट आहे, असे विधान करून फडणवीसांनी शरद पवारांना टोला हाणलाय.
devendra fadnavis criticize sharad pawar on turha symbole raigad fort election commision of india maharashtra politics
social share
google news

Devendra Fadnavis Criticize Sharad Pawar : 'शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याने मुस्लिमांची मते जातात. अशा संभ्रमावस्थेत त्यांनी (शरद पवारांनी)  इतकी वर्ष काढली आणि आता त्यांना रायगड आठवला आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर केली होती. हाच मुद्दा पकडून आता उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) हल्ला चढवला आहे. '40 वर्षानंतर शरद पवार रायगडावर गेले, हे अजित दादांचे क्रेडिट आहे, असे विधान करून फडणवीसांनी शरद पवारांना टोला हाणलाय. (devendra fadnavis criticize sharad pawar on turha symbole raigad fort election commision of india maharashtra politics) 

देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना शरद पवार गटाच्या तुतारी या पक्ष चिन्हाच्या अनावरण सोहळ्याबाबत विचारण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 40 वर्षानंतर पवार साहेब शेवटी रायगडावर गेले. त्यामुळे अजितदादांना या गोष्टीचे क्रेडिट द्यावेच लागेल. कारण अजित दादांमुळेच शरद पवारांना छत्रपती शिवरायांच्या चरणी तब्बल 40 वर्षानंतर जावं लागलं, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना लगावला. तसेच आता तुतारी कुठे वाजते? किती वाजते? आणि कशी वाजते, हे आपल्याला भविष्यात दिसेल, असे देखीव देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 

हे ही वाचा : पक्ष आणि चिन्ह गमावल्यानंतर रोहित पवारांनी घेतली अजित पवारांची भेट, कारण काय?

राज ठाकरे काय म्हणाले? 

'छत्रपती शिवाजी महाराज यांचे कधीही नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवलाय, असा टोला राज ठाकरे यांनी शरद पवारांना लगावला आहे. दरम्यान याआधी मी घेतलेल्या एका मुलाखतीत त्यांना मी प्रश्न केला होता. तुम्ही शाहु, फुले, आंबेडकरांचे नाव घेता, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव तुम्ही घेत नाही? शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याने मुस्लिमांची मते जातात, अशा संभ्रमावस्थेत त्यांनी इतकी वर्ष काढली आहेत. आणि आता त्यांना शिवाजी महाराज आठवले आहेत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Hingoli Accident: देवदर्शनाला पायी निघाले अन् 4 जणांना काळाने रत्यातच गाठलं!

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT