Hingoli Accident: देवदर्शनाला पायी निघाले अन् 4 जणांना काळाने रत्यातच गाठलं!
Hingoli-Washim Accident : हिंगोली-वाशिम महामार्गावर माळहिवरा पाटी गावाजवळ आज पहाटे भीषण अपघात घडला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अपघातात बोलेरो पिकअपने एकूण 6 जणांना चिरडलं असून यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोन जण गंभीर जखमी आहेत.
ADVERTISEMENT
Hingoli-Washim Accident : हिंगोली-वाशिम महामार्गावर माळहिवरा पाटी गावाजवळ आज पहाटे भीषण अपघात घडला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अपघातात बोलेरो पिकअपने एकूण 6 जणांना चिरडलं असून यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोन जण गंभीर जखमी आहेत. हे सर्व हनुमान मंदिरात दर्शनासाठी जात होते. त्याचवेळी मागून येणाऱ्या पिकअपने त्यांना धडक दिली.
ADVERTISEMENT
पिकअप चालक झोपेत गाडी चालवत होता त्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील कारवाई हिंगोली पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, देवदर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांना भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकप वाहनाने चिरडल्याची ही घटना आहे. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. हे सर्व भाविक हिंगोली तालुक्यातील सिरसम गावचे रहिवासी आहेत.
हे वाचलं का?
आज शनिवार (24 फेब्रुवारी) असल्याने भाविकांनी हनुमानाच्या दर्शनाला जाण्याचे नियोजन आखले होते. भाविक त्यांच्या गावातून (सिरसम) माळहिवरा पाटी येथील मारुतीच्या दर्शनाला निघाले होते. यावेळी मागून येणाऱ्या बोलेरो पिकअपने त्यांना चिरडलं.
यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी असलेल्या दोन जणांना हिंगोली शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT