शेतकरी कर्जमाफीवर एकच पर्याय, तो म्हणजे…; देवेंद्र फडणवीस सांगितला उपाय
महाराष्ट्रातील सत्तांतर, आगामी महापालिका निवडणुका, भाजपचं मिशन 2024, या आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. ‘मुंबई Tak बैठक’च्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई Tak ला खास मुलाखत दिली. मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी यांनी ही मुलाखत घेतली. महाराष्ट्राची जीडीपी वाढ आणि कर्ज यावर फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बघितली, तर […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील सत्तांतर, आगामी महापालिका निवडणुका, भाजपचं मिशन 2024, या आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. ‘मुंबई Tak बैठक’च्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई Tak ला खास मुलाखत दिली. मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी यांनी ही मुलाखत घेतली.
ADVERTISEMENT
महाराष्ट्राची जीडीपी वाढ आणि कर्ज यावर फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बघितली, तर स्थिर अर्थव्यवस्था असलेल्या राज्यांमध्ये आपलं राज्य आहे. वाढीचा दर बघितला तर देशाच्या ग्रोथ रेट बरोबर आहे. कोविड काळ सोडला तर आपला राज्याचा विकासदर वाढत आहे. आपल्यानंतरची तीन चार राज्य आपल्याशी स्पर्धा करू शकत नाही.”
“कर्जाचा डोंगर सांगितलं जातं पण, आपला जीएसपीटी भरपूर आहे. केंद्र आणि आरबीआयने 25 टक्क्यांची मर्यादा घालून दिलीये आणि आपली 15 टक्केच आहे. त्यापलीकडे आपण कर्ज घेतलेले नाही. ज्या घोषणा केलेल्या आहेत. मला अर्थशास्त्राची आवड आहे. त्यामुळे सादर केलेले बजेट सर्वसमावेशक आहे.”
हे वाचलं का?
“मागे मी मुख्यमंत्री असताना मागेल त्याला शेततळ्याची योजना आणली. शेतकरी जे मागेल, त्याला आपण ते देणार आहोत. शेतीसाठी खूप मोठ्या तरतुदी केल्या आहेत. मागच्या काळात आम्ही म्हणायचो होऊ शकतं, लोक म्हणायचे होऊ शकत नाही. आम्ही ते केलं.”
“महाराष्ट्रात सिंचनाचे 1 लाख कोटीचे प्रकल्प हातात घेतले. लोक म्हणायचे पैसे येणार कुठून? असंच समृद्धी महामार्गाबद्दल विचारायचे पण, तो झाला आहे.”
ADVERTISEMENT
गुंतवणुकीबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सरकार आल्यानंतर मोठे प्रोजेक्ट येत आहेत. एफडीआयमध्ये आपण चौथ्या क्रमांकावर फेकलो गेलो होतो. आता पुन्हा आपण वर येतोय आणि वर्षभरानंतर पहिल्या क्रमांक येऊ. महाराष्ट्र मॅग्नेटिक आहे. गुंतवणूक येणारच”, असं फडणवीस म्हणाले.
ADVERTISEMENT
शेतकरी कर्जमाफीला माझा विरोध नाही
फडणवीस म्हणाले, “कर्जमाफीला माझा सरसकट विरोध नाही. कर्जमाफीचा अनुभव बघितला तर शेतकऱ्यांची खाती काही काळाकरता नील होतात, पण त्याचा फायदा बॅकांना अधिक होतो. शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होतो. त्यापेक्षा पैसा शेतीत गुंतवला तर नक्कीच फायदा होईल.”
“शेतीतील गुंतवणूक वाढवली. जागतिक बँक, आशियाई बँकेसोबत मिळून काही योजना तयार केल्या. एक अशी योजना तयार केलीये की, दहा गावांमध्ये असलेल्या सोसायटीमध्ये अॅग्री सोसायटी सुरू करतोय. जोपर्यंत शेती शाश्वत होत नाही, तोपर्यंत कर्जमाफी थांबणार नाही. काही प्रमाणात राजकीय आहे. सरकारला संवेदनशील असावं लागतो. कर्जमाफीचा एकच फायदा होतो की, त्या शेतकऱ्याला पुढच्या वर्षी सावकाराकडे जावं लागत नाही.”
“साधारणपणे दोन कर्जमाफी झाल्या आहेत. मागच्या सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार देण्याची घोषणा केली होती, ते पैसे आमचं सरकार देत आहे. शेतीमधील गुंतवणूक वाढवणं हाच कर्जमाफीवर पर्याय आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT