Devendra Fadnavis : “भावी खासदार पोस्टर लावणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम”, फडणवीसांचा इशारा

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Devendra fadnavis says don't put banner for lok sabha election ticket.
Devendra fadnavis says don't put banner for lok sabha election ticket.
social share
google news

Lok Sabha Election 2024, Maharashtra Politics : ‘भावी खासदार म्हणून कुणी पोस्टर लावण्याच्या भानगडीत पडू नका’, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या भाजपतील नेत्यांना सूचक इशारा दिला. मुंबईतील दादर येथील भाजपच्या कार्यालयात पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, लोकसभा मतदारसंघ संयोजक यांच्यासह पक्षाच्या वेगवेगळ्या आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी (30 डिसेंबर) झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी कान टोचले.

ADVERTISEMENT

बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भावी खासदार म्हणून पोस्टर लावण्याच्या भानगडीत पडू नका, काहीजण तसे करत आहेत; पण तसे करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होतो. पक्षाला समजते, त्यांना हे सांगण्याची गरज नाही.”

हेही वाचा >> ‘आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर…’, राऊतांचा अजित पवारांना थेट इशारा

फडणवीस पुढे म्हणाले की, “काहीजण तसे पोस्टर लावत असल्याचे कानावर आले आहे. ज्यांना भाजप कळतो त्यांना तसे केल्याने काय होते, हे चांगलेच माहिती आहे”, असे सांगत देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक लढवण्याबद्दल अतिउत्साही असलेल्या इच्छुकांना इशारा दिला.

हे वाचलं का?

नेत्यांचे फडणवीसांनी टोचले कान

लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार निवडीबद्दल फडणवीस म्हणाले, “तिकीट कुणाला मिळणार, हे पक्षाचे संसदीय मंडळ, ज्येष्ठ नेते ठरवणार आहेत. त्यात डोकं लावू नका. सामान्य, गरीब माणसाशी कनेक्ट ठेवा. कोणत्याही सर्व्हेक्षणात न येणारी तीच आपली व्होटबँक आहे.”

हेही वाचा >> जागा वाटपाबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, काँग्रेसबद्दल काय म्हणाले?

भाजपतील वाचाळवीरांना दम

“मोदींची व्होटबँक जातीपातींपलीकडे आहे. निवडणूक थंड डोक्याने लढवायची असते”, असे सांगत फडणवीस म्हणाले की, “तुम्हाला कोणत्या गोष्टीचा वैताग आला असेल, तर ते पक्षाला सांगा. पक्षाबाहेर बोलू नका. वाचाळवीरांना आवरावेच लागेल. सर्वांचे वहीखाते पक्षाकडे आहे”, असा दमही फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे दिला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT