धनंजय मुंडेंच्या अडचणी संपेनात, कोर्टाचा दणका, करूणा मुंडेंना...
Dhananjay Munde: मुंबईतील माझगाव कोर्टाच्या निर्णयामुळे धनंजय मुंडेंना पुन्हा धक्का बसला आहे. माझगाव कोर्टानं धनंजय मुंडेंची याचिका फेटाळली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
माझगाव कोर्टानं फेटाळली धनंजय मुंडेंची याचिका
करूणा शर्मा यांना पोटगी देण्याचा निर्णय कायम
गेल्या काही दिवसांपासून राज्याचे माजी मंत्री आणि आमदार असलेल्या धनंजय मुंडे यांच्या अडचणी कमी होत नाहीयेत. एकीकडे काही दिवसांपूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या धनंजय मुंडे यांच्यासमोर दुसरीकडे खासगी अडचणीही सुरू आहेत. करूणा शर्मा आणि त्यांच्यातला वाद सध्या कोर्टात आहे. काही दिवसांपूर्वी वांद्रे कोर्टाने करूणा मुंडे यांना महिन्याला दोन लाख रूपये पोटगी देण्याचा निर्णय दिला होता. याला आव्हान देणारी याचिका धनंजय मुंडे यांनी केली होती. त्यावर कोर्टाने त्यांनाच दणका दिला आहे.
हे ही वाचा >> "मुक्ताफळं उधळणाऱ्या माणिकवारांना अजितदादांनी झापलं"
माझगाव कोर्टाचा निर्णय
मुंबईतील माझगाव कोर्टाच्या निर्णयामुळे धनंजय मुंडेंना पुन्हा धक्का बसला आहे. माझगाव कोर्टानं धनंजय मुंडेंची याचिका फेटाळली आहे. करुणा मुंडेंना पोटगी देण्याचा वांद्रे कोर्टाचा निकाल होता. याविरोधात धनंजय मुंडेंनी दाखल याचिका केली होती. मात्र, आता माझगाव कोर्टाने करुणा मुंडेंना 2 लाख पोटगी देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
धनंजय मुंडे यांच्या आर्थिक क्षमतेचा वादच नाही. ते एक प्रसिद्ध राजकीय नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहिलेल्या पत्नी करुणा आणि त्यांच्या मुलांनाही त्यांच्यासारखीच जीवनशैली जगण्याचा अधिकार आहे, असं लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.
हे ही वाचा >> "2029 ला देशाच्या पंतप्रधानपदी...", देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
पत्नी आहे की नाही यावर निर्णय नाही...
करुणा मुंडेंना पोटगी देण्याचे कोर्टाचे आदेश आहेत. 2 लाखांची पोटगी देण्याचा माझगाव कोर्टाचा निर्णय कायम झाला असला, तरी करुणा मुंडे या पत्नी आहेत की नाहीत याचा निर्णय दिलेला नाही. योग्य फोरममध्ये करुणा मुंडे पत्नी आहेत की नाही याचा निर्णय घ्यावा असं कोर्टाने म्हटलं आहे. 5 एप्रिलला कोर्टाने दिलेला हा निर्णय समोर आला आहे.










