सुप्रिया सुळेंनी तुषार खरातांना केले होते कॉल?, फडणवीसांच्या आरोपाने खळबळ.. संपूर्ण प्रकरण काय?

मुंबई तक

मंत्री जयकुमार गोरे प्रकरणी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबई: राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने छळ आणि आक्षेपार्ह फोटो पाठवल्याचा आरोप केल्यानंतर हे प्रकरण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे नावही समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांचे पत्रकार तुषार खरात यांच्याशी फोनवर संभाषण झाल्याचा दावा केला होता. 

तुषार खरात हे एका यूट्यूब चॅनलचे संपादक असून, त्यांनी या प्रकरणाशी संबंधित व्हिडीओ प्रसिद्ध केले होते. मात्र, सुप्रिया सुळे यांनी तुषार खरात यांना नेमके किती वेळा कॉल केला होता, यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

फडणवीसांनी विधानसभेत काय आरोप केले?

फडणवीस यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे तुषार खरात यांच्याशी कॉल रेकॉर्ड्स आढळले आहेत असं म्हटलं आहे. तुषार खरात यांनी आपल्या चॅनलवर जयकुमार गोरे यांच्यावरील आरोपांबाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध केली होती, आणि याच संदर्भात त्यांनी काही व्हिडिओ हे  सुप्रिया सुळे यांना पाठवले होते. यावरूनच थेट मुख्यमंत्र्यांनी रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले, "सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे तुषार खरात यांच्याशी कॉल्स झाले आहेत. जयकुमार गोरे यांच्याविरोधात तयार करण्यात आलेले व्हिडीओ या दोघांना पाठवण्यात आले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल." 

हे वाचलं का?