शिंदे-भाजप सत्तेचा फॉर्म्युला; उपमुख्यमंत्री पदासह १३ मंत्रीपदं, ‘या’ आमदारांना मिळणार संधी
शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर गुवाहाटीत एकवटलेला एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं सांगितलं जात असून, नवं सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असणार आहेत. तर शिंदे गटाला १३ मंत्रिपद दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष […]
ADVERTISEMENT
शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर गुवाहाटीत एकवटलेला एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं सांगितलं जात असून, नवं सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असणार आहेत. तर शिंदे गटाला १३ मंत्रिपद दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त करत शिवसेनेतील ३८ आणि समर्थित अपक्ष आमदारांनी बंड केलं आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह सध्या गुवाहाटीत असून, तिथे भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आलीये.
माहितीनुसार भाजपसोबत सत्तेत गेल्यास एकनाथ शिंदे गटाला ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्रीपदं दिली जाऊ शकतात. तर उर्वरित २९ मंत्री भाजपचे असतील. महत्त्वाचं म्हणजे शिंदे यांच्यासोबत असलेल्या अपक्ष आमदारांना भाजपनं त्यांच्या कोट्यातून मंत्रीपदं द्यावं, अशी एकनाथ शिंदे यांच्या गटाची मागणी आहे.
हे वाचलं का?
‘सरकार भाजपचं येईल, बंडखोरांचं नाही’; अमित शाहांचं नाव घेत ‘सामना’तून बंडखोरांना इशारा
आहे तीच खाती देण्याची मागणी
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्याच्या मंत्रिमंडळातील ८ मंत्री आहेत. या मंत्र्यांना ठाकरे यांच्या सरकारमध्ये असलेलं खातंच हवं आहे. त्यांच्या खात्याने काही निर्णय घेतलेले आहेत. ज्यांना ठाकरे सरकारने स्थगिती दिली आहे. या मंत्र्यांकडील विभागांचा पदभार दुसऱ्या मंत्र्यांकडे सोपवला गेला आहे.
ADVERTISEMENT
शिंदे गटातील कुणाला मंत्रिपदाची संधी?
भाजप-शिंदे गट यांचं सरकार अस्तित्वात आल्यास एकनाथ शिंदे, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, उदय सामंत, शंभुराज देसाई, अब्दुल सत्तार, राजेंद्र पाटील यड्रावकर, बच्चू कडू (प्रहार) या सध्या मंत्री असलेल्या स्थान असणार आहे.
त्याचबरोबर यात काही नवीन नावांचाही समावेश असणार आहे. यात माजी मंत्री दीपक केसरकर, प्रकाश आंबिटकर, संजय रायमूलकर, संजय शिरसाट यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्याबद्दल विचारमंथन सुरू असल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना फोन; राजकीय वर्तुळात चर्चा, राजू पाटील म्हणाले…
शिवसेनेचे १८ पैकी १४ खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?
शिवसेनेचे तब्बल ३८ पेक्षा अधिक आमदार फुटलेले असतानाच आता खासदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आलीये. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी १४ खासदार बंडखोर शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे.
जर १८ पैकी १४ खासदार शिंदेंच्या गटाला जाऊन मिळाले, तर उद्धव ठाकरे यांच्यासमोर पक्षाला पुन्हा उभं करण्याचं मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं. आमदारांपाठोपाठ १४ खासदारही शिंदेंच्या गळाला लागले, तर तर शिंदे गटाकडून शिवसेनेच्या झेंडा आणि निवडणूक चिन्हावर दावा केला जाऊ शकतो.
ठाकरेंचं टेन्शन वाढलं! एकनाथ शिंदे गटाची
सरकारचा पाठिंबा काढण्याची तयारी
राज्यात राजकीय अस्थिरतेचे ढग गडद होत असतानाच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सक्रिय झाले आहेत. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर अनेक निर्णय राज्य सरकारच्या विविध खात्यांनी घेतले होते. त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. राज्यपालांनी आता सरकारकडे २२ जून ते २४ जून दरम्यान घेण्यात आलेल्या निर्णयांच्या फाईल्स मागवल्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT