Beed : ''पंकजा मुंडेंना धोका दिला'', शिंदेंच्या नेत्याच्या ऑडिओ क्लिपने खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

eknath shinde group leader kundlik khade audio clip viral pankaja munde dhananjay munde bajarang sonvane sharad pawar
ऑडिओ क्लिपमध्ये शिंदेंच्या नेत्याने बीडमध्ये पंकजा मुंडेंना धोका दिल्याची कबुली दिली आहे.
social share
google news

Kundalik Khade Audio Clip Viral : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या बीड लोकसभा मतदार संघात पंकजा मुंडे यांचा अवघ्या 6 हजार मतांनी पराभव झाला होता. पंकजा मुंडे यांचा पराभव मराठा विरूद्द ओबीसी फॅक्टरमुळे झाल्याची चर्चा आहे. असे असतानाच आता एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपची मुंबई तक पुष्टी करत नाही. मात्र या ऑडिओ क्लिपमध्ये शिंदेंच्या नेत्याने बीडमध्ये पंकजा मुंडेंना धोका दिल्याची कबुली दिली आहे. या ऑडिओ क्लिपने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. (eknath shinde group leader kundlik khade audio clip viral pankaja munde dhananjay munde bajarang sonvane sharad pawar) 

ADVERTISEMENT

बीडमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची ही ऑडिओ क्लिप असल्याचं सांगितलं जात आहे. या ऑ़़डिओ क्लिपमध्ये खांडे स्वत: पंकजा मुंडेंना धोका दिल्याची कबुली देत आहेत. आपण पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांना धोका दिला आहे, असे खाडे ऑडिओ क्लिपमध्ये म्हणत आहेत. धनंजय मुंडे बीडमध्ये येताच त्यांच्या वाहनावर मी हल्ला करतो, असंही त्यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.

हे ही वाचा : पवारांनी टाकला मोठा डाव, अजित पवारांच्या आमदारांशी गुपचूप भेट

या ऑडिओ क्लिपमध्ये आपण दिलेला शब्द पाळला आता त्यांनी पाळावा, मी पुर्ण काम केलं बाप्पाचं (बजरंग सोनवणे). 376 बुथवरील सर्व यंत्रणा मी बाप्पांना देऊन टाकली होती. मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेंना पहिल्यांदा धोका दिला,असे खाडेंनी ऑडिओ क्लिपमध्ये कबुल केले आहे. आणि बाप्पांना नुसती यंत्रणा दिली नाहीतर बाप्पांना पैसेही दिले, प्रामाणिकपणे बाप्पाच काम केल्याचेही खाडे ऑडिओ क्लिपमध्ये सांगताना दिसत आहे. त्यामुळे आता शिंदे गटाच्या नेत्याने शरद पवार गटाच्या उमेदवाराला मदत केल्याचाही आरोप होत आहे. 

हे वाचलं का?

मुंडे समर्थकांनी खांडेंचं कार्यालय फोडले

दरम्यान ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर बीडमधील मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत. बीड शहरातील जालना रोडवर असलेल्या खांडे यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली असून ऑफिसचीही तोडफोड करण्यात आली आहे. कथित ऑडिओ क्लिप मध्ये कुंडलिक खांडे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेयांच्या बाबत बोलत आहेत. यानंतर मुंडे समर्थकांकडून जिल्ह्यात संताप व्यक्त केला जातोय. 

हे ही वाचा : Eknath Shinde : ठाकरे-फडणवीस लिफ्ट प्रसंगावर शिंदेंचं मोठं विधान

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT