Prataprao Jadhav : ''ठाकरेंमध्ये बाळासाहेबांचा एकही गुणधर्म दिसत नाही''

मुंबई तक

ADVERTISEMENT

eknath shinde minister prataprao jadhav criticize udhhav thackeray on delhi tour maharashtra politics
जालन्यात प्रतापराव जाधव बोलत होते
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरे कोणाचे पाय धरायला दिल्लीला गेले होते

point

मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपा सोबत युती तोडली

point

बाळासाहेबांचा एकही गुणधर्म ठाकरे यांच्यात दिसत नाही

Prataprao Jadhav Criticize Uddhav Thackeray : गौरव साळी, जालना :  ''शिवसेनेचा आणि बाळासाहेबांचा एकही गुणधर्म उद्धव ठाकरे यांच्यात दिसत नाही, आज बांगलादेशमध्ये हिंदूंची कत्तल होतेय आणि त्यांनी एक शब्द ही काढला नाही असा हल्लाबोल केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केला आहे. तसेच बाळासाहेबांचे वारसदार म्हणून घेणारे उद्धव ठाकरे आज दिल्लीला लोटांगण घालतायत अशी टीका देखील प्रतापराव जाधव यांनी केली आहे. (eknath shinde minister prataprao jadhav criticize udhhav thackeray on delhi tour maharashtra politics) 

ADVERTISEMENT

जालन्यात प्रतापराव जाधव बोलत होते. ''बाळासाहेबांचे वारसदार म्हणून घेणारे उद्धव ठाकरे आज दिल्लीला लोटांगण घालत आहेत. 2019 च्या निवडणुकीत जनतेने शिवसेना भाजपा युतीला कौल दिला होता, मात्र आपल्या नेत्यांना सत्तेचा मोह आवरता नाही आला आणि स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपा सोबत असलेली युती त्यांनी तोडली अशी टीका प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ज्या काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत आमचा शिवसैनिक गावागावात लढत होता अशांसोबत जाऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद मिळवलं, असे देखीव प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : Raj Thackeray : '...तर ते मी खपवून घेणार नाही', ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला, राज ठाकरेंचा इशारा

उद्धव ठाकरे कोणाचे पाय धरायला दिल्लीला गेले होते असा सवाल करत, सत्तेच्या मोहासाठी उद्या मुख्यमंत्री म्हणून माझा चेहरा पुढे यावा म्हणून काँग्रेसच्या चिल्लर लोकांच्या भेटी उद्धव ठाकरे घेत बसलेत अशी टीका जाधव यांनी केली आहे. तसेच शिवसेनेचा आणि बाळासाहेबांचा एकही गुणधर्म उद्धव ठाकरे यांच्यात दिसत नाही, आज बांगलादेश मध्ये हिंदूंची कत्तल होतेय त्यांनी एक शब्द ही काढला नाही असा निशाणा प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर साधलाय. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Mumbai tak Baithak 2024 Schedule: विधानसभेआधी उडणार धुरळा! ‘मुंबई Tak बैठक’मध्ये 'हे' दिग्गज मांडणार व्हिजन

आमच्या नेत्यांवर जर आरोप करतील तर त्याच भाषेत शिव सैनिक आरोप करत त्यांना उत्तर देतील. आरे ला कारे ने उत्तर द्यावं,  ही आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे. आपल्याला जर एका गालात कुणी मारली तर आपण त्यांच्या दुसऱ्या गलात मारली पाहिजे. हे देखील बाळासाहेब आम्हाला सांगायचे. आम्ही बाळासाहेब यांची विचारांचे सैनिक आहेत. संयम पळण्यासही मर्यादा असतात, त्या मर्यादा त्यांनी ओलांडल्या आहेत. त्यामुळे त्याच भाषेत त्यांना प्रत्युत्तर मिळेल,  असेही प्रतापराव जाधव म्हणाले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT