EC सुनावणी: ‘अजित पवार गटाचा खोटेपणा, 20 हजार शपथपत्रात..’, पवार गटाच्या वकिलांचा मोठा आरोप
Sharad Pawar vs Ajit Pawar: अजित पवार गटाने 20 हजार शपथपत्रात खोटेपणा केल्याचा आरोप शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे. निवडणूक आयोगातील सुनावणीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
ADVERTISEMENT

NCP: नवी दिल्ली: एकीकडे संपूर्ण देशाला दिवाळीचे वेध लागलेले असताना दुसरीकडे राजकीय पातळीवर मात्र बऱ्याच उलथापालथी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातही महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती ही दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीची होत चालली आहे. काही महिन्यांपूर्वीच शिवसेना पक्ष हा शिंदेंकडे सोपविल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला होता. आता पुन्हा एकदा असंच प्रकरण निवडणूक आयोगासमोर आलं असून त्याची आज (9 नोव्हेंबर) सुनावणी पार पडली. शरद पवार गट आणि अजित पवार गट हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचं यासाठी आमनेसामने आले आहेत. याचबाबतच्या सुनावणीत अजित पवार गटाने 20 हजार शपथपत्रांमध्ये खोटेपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. (election commission hearing ajit pawar faction lies 20 thousand affidavits have errors sharad pawar faction lawyer abhishek manu singhvi major allegation)
शरद पवार गटाकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. त्यावेळी त्यांनी थेट असं म्हटलं की, अजित पवार गटाने विकृत पद्धतीने खोटेपणा केला असून त्यांचावर कारवाई झाली पाहिजे तसंच त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले पाहिजे.
अजित पवार गटावर अभिषेक मनु सिंघवींचे गंभीर आरोप..
‘जवळजवळ दीड तास निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद झाल्यानंतर आजची सुनावणी संपली. आमच्याकडून जेव्हा युक्तिवाद सुरू झाला तेव्हा आम्ही अत्यंत धक्कादायक असे आणि विचित्र अशा गोष्टी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्या.’
‘यामध्ये महत्त्वाची बाब ही होती की, जी कागदपत्रं याचिकाकर्त्याने निवडणूक आयोगाकडे दिली होती. आम्ही जवळजवळ 20 हजार असे शपथपत्र शोधले आहेत. त्यापैकी 8900 शपथपत्रांची यादी बनवून दिली आहे निवडणूक आयोगाला. ज्यामध्ये भ्रष्ट पद्धतीने विकृत पद्धतीने शपथपत्र आणि कागदपत्रांमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आहेत.’