'अरे नालायक माणसा तुला माणसाची किंमत नाही', ठाकरेंची फडणवीसांवर बोचरी टीका...

मुंबई तक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोसाळकरांची हत्या झाल्यानंतर विरोधकांना प्रत्युत्तर देताना म्हणाले होते, गाडीखाली कुत्रं आलं तरी हे राजीनामा मागितलं. त्यावरूनच उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर त्यांनी बोचरी टीका केली आहे.

ADVERTISEMENT

mahavikas aghadi
political
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'अरे नालायक माणसा तुला माणसाची किंमत नाही'

point

नेत्याची तुलना कुत्र्यासोबत करता

point

फडणवीस तुम्हाला माणसाची किंमत नाही

Uddhav Thackeray : राज्यात चाललेल्या गुंडागर्दीच्या विषयावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. गुंडागर्दीचं राज्य आलं असले तरी त्याला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काहीही करू शकत नाहीत अशी जोरदार टीका त्यांनी त्यांच्यावर केली. यावेळी त्यांनी अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्येवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याच्या गोष्टीवरून केलेल्या वक्तव्याचाही समाचार घेतला. यावेळी त्यांनी, 'अरे नालायक माणसा तुला माणसाच्या जीवाची किंमत नाही' म्हणत उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर बोचरी टीका केली. 

कुत्रं आलं तरी राजीनामा मागितल

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली. त्यानंतर विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांचा राजीनामा मागण्यात आला. त्यानंतर फडणवीसांनीही विरोधक, 'गाडीखाली कुत्रं आलं तरी राजीनामा मागितलं' अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी, अरे नालायक माणसा म्हणत त्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. 

हे ही वाचा >> 'काँग्रेस ही अजरामर म्हातारी ती कधीच मरणार नाही'

खासदारांवर जोरदार हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमधून सभा घेताना भाजपसह शिंदे गटातील आमदार आणि खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करत अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावरूनही त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.

भारतरत्न पुरस्काराचाही बाजार

भाजपने भारतरत्न पुरस्काराचाही बाजार मांडला. त्यांच्या मनात येईल त्यांना पुरस्काराचे वाटप केले आहे. त्याचवेळी भाजपकडून कशा पद्धतीने भाजपवर अन्याय केला जात आहे त्यावरूनही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. 

हे ही वाचा >> देशमुख-शिंदेही देणार धक्का?, बावनकुळेंचं मोठं विधान


 

हे वाचलं का?

    follow whatsapp