Congress मध्ये भूकंप होणार! अशोक चव्हाणानंतर आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर!
महाराष्ट्राच्या राजकारणानंतर मध्य प्रदेशातही मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेले कमलनाथ आणि त्यांचा मुलगाही आता भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मध्य प्रदेशातही काँग्रेसला मोठं खिंडार

कमलनाथही आता भाजपच्या वाटेवर

महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेशातही काँग्रेसमध्ये भूकंप
Kamal Nath: येत्या काही दिवसात 2024 च्या लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच काँग्रेस पक्षात मात्र काहीही चांगलं होताना दिसून येत नाही. जागांबाबत जोरदार चर्चा चालू असतानाच काँग्रेसमधील अनेक जुने जाणते नेते मात्र काँग्रेसचा (Congress) हात सोडून जात आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. त्यानंतर आता मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्यासह त्यांचा मुलगा नकुलनाथही आता भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे.
...तरीही काँग्रेसकडून प्रयत्न नाही
लोकसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला एक एक मोठे धक्के बसत आहेत. महाराष्ट्रानंतर आता मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री कमलनाथही भाजपच्या वाटेवर असल्याची चित्र गडद होत आहे. तरीही काँग्रेस नेतृत्वाकडून कमलनाथ यांच्याशी कोणताही संपर्क करण्यात साधण्यात आला नाही. त्यामुळे आता हे ही चित्र स्पष्ट झाले आहे की, ते जरी भाजपमध्ये जाणार असले तरी त्यांना थांबवण्यासाठी अजून कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत हे ही स्पष्ट झाले आहे.
मी स्वतः माहिती देईन
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ दिल्लीला पोहोचल्यानंतर त्यांनी त्यांनी काँग्रेस सोडण्याबाबत आपलं मौन सोडले. काँग्रेस सोडण्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, असा काही प्रकार घडला तर त्याची माहिती आपण स्वतः देऊ असं त्यांनी सांगितले.
काँग्रेसचा लोगो हटवला
भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत कमलनाथ यांनी पत्रकारांना सांगितले की, असे काही घडले तर भाजपप्रवेशाबाबत मी स्वतःच तु्म्हाला सांगेन असं स्पष्टपणे सांगितले. तर दुसरीकडे, कमलनाथ यांचे सुपुत्र खासदार नकुलनाथ यांनी सोशल मीडियावरी त्यांच्या प्रोफाईवरून काँग्रेस पक्षाचाही लोगो हटवला आहे. तर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हे मात्र अजूनही असं समजतात की, 'कमलनाथ सोनिया गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या कुटुंबियांना ते कधीच सोडू शकत नाहीत.'