काँग्रेस नेत्याचा गोपीनाथ मुंडेंनी ‘असा’ केलेला करेक्ट कार्यक्रम, तावडेंनी सांगितला भन्नाट किस्सा
Maharashtra Politics: भाजप नेते विनोद तावडे यांनी मुंबई Tak च्या चावडी या विशेष कार्यक्रमात बोलताना दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी एक अतिशय रंजक किस्सा सांगितला.
ADVERTISEMENT
Political News of Maharashtra मुंबई: भाजपचे (BJP) दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा आज (3 जून) नववा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. गोपीनाथ मुंडे हे राजकारणातील अजातशत्रू म्हणून ओळखले जायचे. त्यामुळे फक्त पक्षातच नव्हे तर पक्षाबाहेरही त्यांचे अनेक नेत्यांशी सलोख्याचे संबंध होते. अशावेळी त्यांच्या सर्वाधिक जवळचे समजले जाणारे भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी मुंबई Tak च्या ‘चावडी’वर बोलताना गोपीनाथ मुंडेंविषयी एक मजेशीर गोष्ट सांगितली. तसंच्या त्याच्यातही कसा एक कसलेला राजकारणी होता हेही आवर्जून सांगितलं. (gopinath munde bjp vinod tawde interesting story congress leader mumbai tak chawdi)
ADVERTISEMENT
मुंबई Tak च्या चावडीवर आलेल्या विनोद तावडे यांनी अगदी दिलखुलासपणे गप्पा मारल्या. यावेळी राजकीय मुद्द्यांवर त्यांनी भाष्य तर केलंच मात्र, यासोबत काही मजेशीर किस्से देखील सांगितले. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडेंविषयी एक भन्नाट किस्सा सांगितला.
अन् मुंडेंनी काँग्रेसच्या नेत्याचा ‘करेक्ट कार्यक्रम’च केलेला!
एका प्रश्नाला उत्तर देताना विनोद तावडे म्हणाले की, ‘टीव्ही आणि पेपरमध्ये जास्त दिसणं यापेक्षा तुम्ही लोकांमध्ये जास्त दिसणं.. यातून तुम्ही लोकांच्या मनात जास्त जाता.. कुठल्याही पक्षाचं का असे ना.. तरुण नेतृत्व उभं राहिलं पाहिजे.’
हे वाचलं का?
‘राजकारण जे आहे ना ते इव्हेंटने होत नाही.. इव्हेंट, सभा करून राजकारण निघत नाही. चांगल्या सभांबरोबर बाकीची जोडणी लागते. मला आठवतं.. 2004 ची निवडणूक असेल एका ठिकाणी एका जिल्ह्यात मुंडे साहेबांसोबत मी दौऱ्यावर होतो. तिथे सभा झाली मोठी.. सभा झाल्यानंतर भाजपच्या तिथल्या नेत्यांना भेटण्यासाठी वेळ ठेवला होता. त्यावेळी मुंडेसाहेब म्हणाले की, आपल्याला काँग्रेसच्या नेत्याकडे जायचं आहे.’
हे ही वाचा>> मुंबई Tak चावडी: ‘शिवसेनेशी युतीचा निर्णय ही भाजपची चूकच’, विनोद तावडेंचा गौप्यस्फोट
‘मी म्हटलं भाजपच्या लोकांना भेटायला आपल्याला वेळ पुरत नाही.. आपण कुठे काँग्रेसच्या नेत्याला भेटायला जायचं. मी म्हटलं भाजपच्या लोकांना भेटायलाच वेळ मिळत नाही. आपण कुठे काँग्रेसच्या लोकांना.. तर ते म्हणाले नाही.. नाही.. जायचंय. मी म्हटलं नको.. ऐका माझं.. ते म्हणाले जायचंय..
आता नेता म्हटलं जायचंय तर जायचंय..’
ADVERTISEMENT
‘शेवटी एक भेट कमी करून आम्ही त्यांच्याकडे गेलो. भेट झाली त्यानंतर आम्ही एअरपोर्टला गेलो विमान पकडलं आणि मुंबईला आलो. त्यानंतर मला म्हणाले असं कर.. या पेपरला फोन करून सांग की, आपली भेट झाली आणि भाजप त्याला तिकीट देणार आहे असं घोषित कर.. सांग तर म्हणाले.. मी सांगितलं.’
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> मुंबई Tak चावडी: ‘खडसेंनी भाजपमध्ये परत यावं कारण…’, विनोद तावडेंनी स्पष्टच सांगितलं!
‘दुसऱ्या दिवशी हेडलाइन.. मुंडे आणि काँग्रेसच्या या नेत्याची भेट झाली आणि तो भाजपकडून उभा राहणार.. त्याला तिकीट मिळणार होतं काँग्रेसकडून ते कापल्या गेलं. आणि त्याला जर तिकीट मिळालं असतं तर आमचा उमेदवार हरला असता. म्हणून हे केलं. आता हे जे लागतं ना इव्हेंटच्या नंतर ते हे.’
‘सभेनंतर मी चार लोकांसोबत बसलो का.. मी चर्चा केला का.. यावरुन तुमच्याशी माणसं जोडली जातात.’ असं म्हणत विनोद तावडेंनी गोपीनाथ मुंडे हे कशा पद्धतीने राजकारण करणारे नेते होते आणि त्यांचा जनसंपर्क कसा दांडगा होता हेही यानिमित्ताने सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT