Pooja Khedkar: प्रचंड चर्चेत होती पुण्याची IAS पूजा खेडकर, तडकाफडकी वाशिमला बदली का?
IAS Puja Khedkar: प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर हिच्या अरेरावी वागण्यामुळे तिची पुण्याहून थेट वाशिममध्ये बदली करण्यात आली आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
IAS पूजा खेडकरची वाशिमला बदली
वरिष्ठांनी केलेली मुख्य अप्पर सचिवांकडे तक्रार
पूजा खेडकरच्या बदली नेमकं कारण काय?
Pune IAS Puja Khedkar Transfer: पुणे: महाराष्ट्राची प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर तिच्या वागण्यामुळे (IAS Puja Khedkar transfer)चर्चेत आली आहे. अलीकडेच, व्हीआयपी नंबर प्लेट असलेल्या ऑडी कारवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन असं लिहल्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली होता. नंतर असा दावा करण्यात आला की, पूजाने तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबरवरही कब्जा केला होता. तिथे तिने तिच्या नावाचा बोर्डही चिकटवला होता. पूजाच्या या वागणुकीबाबत अखेर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहित IAS पूजा खेडकर हिची तक्रार केली. ज्यामुळे आता तिची थेट वाशिमला बदली करण्यात आली आहे. (government action against trainee pune ias pooja khedkar she was accused of occupying her senior chamber rapidly transferred to washim)
ADVERTISEMENT
IAS पूजा खेडकरची पुण्याहून वाशिमला बदली
अहवालानुसार, पुण्याच्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिची पुण्यातून वाशीम येथे बदली करण्यात आली आहे. पूजा आता वाशिमच्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सांभाळणार आहे. सरकारी कार्यालयात ती स्वतःची ऑडी कार घेऊन यायची. तसेच तिने तिच्या या आलिशान कारवर सरकारी बोर्डही लावला होता.
हे ही वाचा>> संभाजी भिडे पुन्हा बरळले, महिला म्हणाल्या, ''भिडेच्या मिशाच कापून टाकू''
रिपोर्टनुसार, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून स्वत:साठी स्वतंत्र आसनव्यवस्था, कार, निवास आणि हवालदाराची मागणी करत होती. या सगळ्या इथेच संपल्या नाही. तर पूजाचे वडील दिलीपराव खेडकर यांनी आपल्या मुलीला या सर्व सुविधा देण्यासाठी अनेकवेळा जिल्हाधिकारी कार्यालयावर दबाव आणल्याचा आरोप आहे.
हे वाचलं का?
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर हिने अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांची चेंबरही 'कब्जा' घेतला होता. तिथे तिने स्वत:च्या नावाचा बोर्डही लावला होता. तसेच वरिष्ठांच्या चेंबरमधून त्यांचे सामान बाहेर काढून स्वत:चे सामान तेथे ठेवले होते. या सगळ्या बाबी निदर्शनास येताच जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे याबाबत तक्रार केली.
हे ही वाचा>> Mazi ladki bahin yojana : 'या' महिला ठरणार अपात्र, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय?
मंत्रालयाला पाठवलेल्या अहवालात 18 ते 20 जून 2024 दरम्यान पूजा खेडकर यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व संमतीशिवाय खुर्च्या, सोफा, टेबलसह सर्व वस्तू बाहेर काढल्याचं सांगण्यात आलं आहे. यानंतर महसूल सहाय्यकाला बोलावून तिच्या नावाचे लेटरहेड, व्हिजिटिंग कार्ड, पेपरवेट, राष्ट्रध्वज, नेमप्लेट, रॉयल सील, इंटरकॉम उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या होत्या.
ADVERTISEMENT
कोण आहे पूजा खेडकर?
प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर हिने 2021 ची UPSC परीक्षा उत्तीर्ण केली होती. UPSC परीक्षेत तिचा अखिल भारतीय क्रमांक 821 होता.
ADVERTISEMENT
तिने स्वत:ला दिव्यांग घोषित करत कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयात याचिकाही दाखल केली होती. पूजाचा युक्तिवाद असा होता की अपंग उमेदवारांना एससी/एसटी उमेदवारांपेक्षा जास्त अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांनाही समान लाभ देण्यात यावा.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT