NCP : ‘…तर जयंत पाटलांनी महायुतीत शपथ घेतली असती’, अजित पवार गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट
जयंत पाटील हे एका घटनेमुळे तिकडे थांबले.ती घटना मी माध्यमांना सांगणार नाही. ती नंतर कधी सांगेन. नीतीमुल्ये पाळणारा मी माणूस आहे, असे म्हणत मुश्रीफ यांनी सूचक विधान केले.
ADVERTISEMENT
Hasan Mushrif Criticize Jayant Patil : राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटात आरोप-प्रत्यारोप सुरु असतात. अशात अनेक खळबळजनक गोष्टी देखील समोर येत असतात. असाच खळबळजनक दावा आता अजित पवार गटाच्या नेत्याने केला आहे. ”आमदार जयंत पाटील (Jayant Patil) हे काही घटनेमुळे बचावले, नाही तर त्यांनी आमच्याबरोबर शपथ घेतली असती”, असा गौप्यस्फोट वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केला आहे. मुश्रीफ यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. (hasan mushrif big statement on jayant patil oath in mahayuti ncp crisis ajit pawar sharad pawar)
ADVERTISEMENT
इचलकरंजी येथील कार्यक्रमात हसन मुश्रीफ बोलत होते. जयंत पाटील यांनीही आमच्याबरोबर शपथ घेतली असती. आता मी इतिहास सांगत बसत नाही. ते गोपनीय आहे. मात्र, आज आम्ही ज्या पक्षाबरोबर गेलो आहे त्यांच्याशी इमान ठेवण आणि त्यांच्यासाठी जीवाचं रान करणं हा मा्झा स्वभाव आहे. आता आम्ही भूमिका बदलली आहे. त्या भूमिकेची प्रामाणिक राहणं हे आमचं काम आहे, कर्तव्य आहे.
हे ही वाचा : आई-वडिलांच्या शोधात स्वित्झर्लंडहून मुंबईला आली, पण नंतर जे उघड झालं त्यामुळे तरूणीला धक्काच बसला!
वास्तविक जयंत पाटलांनी असं स्टेटमेंट करणे उचित नाही,ते एका घटनेमुळे तिकडे थांबले.ती घटना मी माध्यमांना सांगणार नाही. ती नंतर कधी सांगेन. नीतीमुल्ये पाळणारा मी माणूस आहे, असे म्हणत मुश्रीफ यांनी सूचक विधान केले.
हे वाचलं का?
जयंत पाटील काय म्हणाले?
खरं तर जयंत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती. याच टीकेचा समाचार आता मुश्रीफ यांनी घेतला आहे.इचलकरंजीत 25 ऑक्टोंबरला रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी थेट हसन मुश्रीफ यांना आपण तिकडे (महायुतीत) पाठवलेल्याचे विधान केले. रावणाचा दहन करण्यासाठी मागच्या वर्षी मुश्रीफ आले होते. आता मात्र थेट रावणाच्या जवळ त्यांना पाठवलेला आहे. त्यामुळे मुश्रीफ यांनी रावण दहन करावं असं म्हणत पाटलांनी भाजपावर टीकास्त्र डागलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता रावणाची लंका दहन करण्यासाठी आम्ही मुश्रीफाना पाठवले असल्याचे म्हणत पाटलांनी टीका केली होती.
हे ही वाचा : Crime : ज्याच्यासाठी मायबापाला सोडलं, त्यानेच मित्रांसोबत मिळून केला गँगरेप
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT