उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद कसं गेलं?, अजित पवारांनी सांगितली Inside Story

ADVERTISEMENT

how did uddhav thackeray lose the post of chief minister ajit pawar told inside story
how did uddhav thackeray lose the post of chief minister ajit pawar told inside story
social share
google news

पुणे: राज्यात 2022 साली एक मोठा राजकीय भूकंप घडला आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं सरकारच कोसळलं. खरं तर त्यांच्याच पक्षाचे साधारण 40 आमदार हे त्यांच्यासमोरुन निघून गेले. ज्यामुळे उद्धव ठाकरेंना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. हे सगळं घडविण्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हात होता हे आता जगजाहीर झालेलं आहे. मात्र, हे सगळं नेमकं घडलं कसं याची Inside Story ही स्वत: विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितली आहे. (how did uddhav thackeray lose the post of chief minister ajit pawar told inside story)

पुण्यात सकाळ वृत्त समूहाच्या एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद कसं गेलं आणि त्यांचं सरकार कसं कोसळलं याचा नेमका किस्सा सांगितला आहे. जाणून घेऊयात त्याचविषयी.

उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद कसं गेलं?

‘राज्यातील सत्ताबदल हा काही अचानक झालेला नव्हता. इथे काही जणं आहेत ते साक्षीदार आहेत. थोडंसं कधीही एकनाथ शिंदे यांच्याबाबत काही गोष्टी कानावर यायच्या.. ते नाराज नंतर.. नंतर होते. त्यांच्या मनात काही वेगळं शिजत होतं हे आम्हाला कळत होतं. आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या ही गोष्ट कानावर घातली. आम्ही अनेकदा उद्धवजींच्या कानावर ही गोष्ट घातली. उद्धवजी म्हणायचे ठीकए… मी त्यांच्याशी बोलतो. पवार साहेब पण त्यांच्याशी बोलायचे. पण ते बोलून एखाद्याच्या मनात वेगळं काही तरी चाललेलं असेल आणि तुम्ही त्याला विचारलं काय रे… काही गडबड नाही ना.. तो म्हणाराय का.. नाही, नाही.. माझ्या मनात गडबड.. गडबड आहे.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘ते म्हणणारच ना.. काही गडबड नाही, काही काळजी करू नका. मी गावाकडे आलेलो आहे. शेती करतोय वैगरे, वैगरे..’

हे देखील वाचा>> मुख्यमंत्रीपदासाठी रावसाहेब दानवेंची अजित पवारांना खुलेआम मोठी ऑफर!

‘जवळपास उद्धवसाहेब ठाकरेंचं सरकार महाराष्ट्रात आलेल्या दिवसापासून आता जे सरकार आलेलं आहे त्या सरकारमधला महत्त्वाचा पक्ष हा भाजप.. हे सरकार बाजूला जावं म्हणून पहिल्या दिवसापासून प्रयत्न करत होतं. हा प्रयत्न करत असताना एक नेत्याच्या धर्मपत्नीने सांगितलं.. माझे मिस्टर अनेकदा वेशभूषा बदलून रात्रीचे बाहेर जायचे. त्या धर्मपत्नीलाही माहीत नव्हतं की, ते कशा करता बाहेर जायचे. पण नंतर कळलं की, ते कशाकता बाहेर जात होते.’

ADVERTISEMENT

‘आता त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री सांगत आहेत की, एकनाथराव आणि संबंधित व्यक्ती कितेकदा भेटली. त्यामुळे हे काही एका दिवसात घडलेलं नव्हतं.’

ADVERTISEMENT

‘वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही झालं तर वडीलकीच्या नात्याने पवार साहेब आणि आम्ही सगळ्यांनी राज्याचं पाहिलं पाहिजे. काँग्रेसचं असेल तर काँग्रेसचे नाना पटोले, अशोक चव्हाण वैगरे यांनी पाहिलं पाहिजे. इकडचं काही असेल तर उद्धव ठाकरे आणि बाकी त्यांच्या नेत्यांनी पाहिलं पाहिजे. कारण शिवसेनेच्या कामाची पद्धत ही बाळासाहेबांपासून लोकांना माहिती आहे.’

‘आम्ही वेळोवेळी सांगत होतो. इथल्या पण अनेकांनी साहेबांच्या आणि उद्धवजींच्या कानावर घातलं होतं. पण आमच्या हातात राज्य असताना देखील काही काही बाबी इतक्या व्यवस्थितपणे झाल्या की, विश्वासाने उद्धव ठाकरे साहेबांनी ठाणे जिल्ह्यात कोण अधिकारी असावेत हे सगळं ठरवण्याचा अधिकार एकनाथरावांना दिलेला होता. तिथले पोलीस आयुक्त असू द्या.. ठाण्याचे आयुक्त असू द्या.. सहा महापालिका आहेत तिथले आयुक्त असू द्या. सगळा अधिकार एकनाथरावांना होता.’

’20 जूनला मतदानाच्या दिवशी एकनाथराव बाहेर पडले. त्यादिवशी त्यांनीच आणून ठेवलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना सूरतला सुरक्षितपणे पोहचवण्याचं काम केलं.’

हे देखील वाचा>> राजकीय नसबंदी…,भाजपचे पाळलेले पोपट, संजय राऊतांची मनसेवर टीका

‘त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की, जिथे असतील तिथून त्यांच्या गाड्या वळवा आणि मातोश्रीवर आणा. पण अधिकाऱ्यांना तिथे बसवण्याचं काम, अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी जरी सही केलेली असली तरी ते करून घेण्याचं काम एकनाथरावांनी केलेलं असल्याने ते सगळे अधिकारी एकनाथरावांशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे गाड्या पद्धतशीर बाहेर पडल्यावर म्हणाले की, कुठे काही दिसत नाही. असं ते घडलं.’ असं अजित पवार म्हणाले.

‘…नाहीतर आजही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असते’

‘उद्धव ठाकरेंवर बरंच प्रेशर होतं. त्यांना वाटलं नव्हतं की, आपल्या जीवाभावाचे सहकारी आपल्याला इतक्या मोठ्या संख्येने सोडून जातील. तो पहिला त्यांना शॉक होता. पहिल्यांदा 15-16 जणं सूरतला गेले. तरी देखील अनेक आमदार उद्धवजींसोबत होते.’

‘वर्षावर आम्ही पाहायचो.. गुलाबराव पाटलांना, दिलीप लांडेंना, दीपक केसरकर, उदय सामंत यांना. सगळ्यांना आम्ही बघत होतो. परंतु नंतरच्या काळात या सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं काम ज्या प्रकारे 2019 मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतल्यानंतर जसं तीनही पक्षाच्या आमदारांना एकजुटीने ठेवण्याचं काम तीनही पक्षाच्या नेत्यांनी ज्या जबरदस्तपणे केलं. त्याच पद्धतीने आताही केलं असतं तर सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून दिसले असते हे सत्य आहे.’ असा किस्साच अजिबात पवार यांनी स्वत: सांगितला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT