‘मलाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यात रस’, आता रामदास आठवलेंचाही थेट दावा

मुंबई तक

ADVERTISEMENT

i am also interested in becoming the chief minister of maharashtra now ramdas athawale also claims directly
i am also interested in becoming the chief minister of maharashtra now ramdas athawale also claims directly
social share
google news

सांगली: केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना देखील आता महाराष्ट्राचं मुख्यमंत्री (Chief Minister) व्हायचे आहे. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री होण्यासाठी आपण इच्छुक असल्याचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. याचवेळी रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सामील होण्याची ऑफरही दिली आहे. (i am also interested in becoming the chief minister of maharashtra now ramdas athawale also claims directly)

ADVERTISEMENT

सांगली येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, आजकाल प्रत्येकजण मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत आहे. मात्र, कुणाकडे बहुमत असेल तरच हे शक्य आहे. ते पुढे म्हणाले की, यावर बरीच चर्चा होत असल्याने. मला सांगायचे आहे की, ‘मलाही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे.’

‘मी मुख्यमंत्री व्हायला तयार आहे’

ते पुढे म्हणाले, ‘अशी काही चर्चा झाली तर मी नक्कीच मुख्यमंत्री व्हायला तयार आहे. मात्र सध्या आमचे सरकार स्थिर असून एकनाथ शिंदे चांगले काम करत आहेत. ते दिवसाचे 16 ते 18 तास काम करतात. ते कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत.’ असं म्हणत आठवलेंनी मुख्यमंत्री शिंदेंचं बरंच कौतुक केलं.

हे वाचलं का?

‘शरद पवारांनी आम्हाला राजकारण शिकवलं’

आठवले पुढे म्हणाले, ‘शरद पवारांनी आम्हाला राजकारण शिकवले आहे. त्यांच्यासारख्या अनुभवी लोकांनी एनडीएमध्ये यावे. जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश कुमार यांच्यासारखे विविध विचारसरणीचे लोकही एनडीएमध्ये सामील झाले होते. त्यामुळे पवार साहेबांनी या प्रस्तावावर विचार करावा.’ असं थेट आठवले म्हणाले.

हे ही वाचा>> “गौतमी पाटील बैलासमोर नाचो, नाहीतर…”, अजित पवारांची तुफान फटकेबाजी

शरद पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मागील आठवड्यातच एका जाहीर कार्यक्रमात म्हटलं होतं की, त्यांनाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचं आहे. ज्यासाठी ते आता देखील तयार आहेत.

ADVERTISEMENT

नुकतेच आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुंबई Tak शी खास बातचीत करताना सांगितले होतं की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची अवस्था डळमळीत झाली आहे. मग हवं तर त्यांनी भारत जोडो यात्रा करो किंवा लोकसभा सदस्यत्व गमावल्याचं कारण देत गोंधळ निर्माण करो.. पण मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीए ही खूप मजबूत आहे. यावेली आठवलेंनी अदानी प्रकरणातील शरद पवारांचे विधानही योग्य ठरवले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> ‘भाजप सापाप्रमाणे डूख धरून दंश करणारा पक्ष..’, शिवसेनेची (UBT) विखारी टीका

अदानी आणि पीएम मोदी यांच्या नात्याबद्दल बोलताना आठवले म्हणाले की, मोदी आणि अदानी यांच्यात कोणताही संबंध नाही. अदानींसाठी जेपीसीची गरज नाही. काँग्रेसला टोला लगावत ते म्हणाले की, काँग्रेसची अवस्था सध्या वाईट आहे. पण पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए खूप मजबूत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT