जुनं वैर… नवी मैत्री! चंद्रबाबू नायडूंच्या अटकेचा मेसेज काय? वाचा राजकीय Inside Story

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

chandrababu Naidu arrest : Is this a political move of Chief Minister Jaganmohan Reddy's far-reaching strategy?
chandrababu Naidu arrest : Is this a political move of Chief Minister Jaganmohan Reddy's far-reaching strategy?
social share
google news

Chandrababu Naidu News : टीडीपी नेते एन चंद्राबाबू नायडू 2019 पासूनच राजकीय शत्रुत्वाचे बळी ठरत आहेत. जगनमोहन रेड्डी 2019 मध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यापासून नायडू, त्यांचा मुलगा आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध अनेक कारवाया झाल्या. अशा गोष्टींमुळे ते इतके दुखावले गेले की त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. (what is political significance of Chandrababu Naidu’s arrest)

ADVERTISEMENT

सूडाचे राजकारण पहिल्यांदा बघायला मिळाले ते दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये. पण, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात महाराष्ट्रातही याची झलक पाहायला मिळाली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक तुम्हाला आठवत असेल.

चंद्राबाबू नायडूंना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवणं जेवढं सोपं वाटतं, तितकं सोपं आहे का? ही सुद्धा मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या दूरगामी रणनीतीची राजकीय खेळी आहे का? आणि आंध्र प्रदेशात काय चालले आहे, भाजपचे राजकारण कुठे चालले आहे? कारण नायडू यांची अटक अशा वेळी झाली, जेव्हा ते पुन्हा एनडीएमध्ये परतणार असल्याची चर्चा होती.

हे वाचलं का?

चंद्रबाबू नायडूंची अटक सहज नाही?

10 सप्टेंबर रोजी चंद्राबाबू नायडू यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. 1981 मध्ये नायडू आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांची मुलगी भुवनेश्वरी यांचा विवाह झाला होता. असे म्हटले जाते की भुवनेश्वरीने तिचा 42 वा वाढदिवस अभिनेता भाऊ नंदामुरी बालकृष्ण यांच्या कुटुंबीयांसह तिचे चाहते आणि कामगारांसोबत साजरा करण्याची तयारी केली होती. पण एक दिवस आधी, 9 सप्टेंबर रोजी राज्याच्या CID ने माजी मुख्यमंत्री नायडू यांना अटक केली आणि आता त्यांना 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राजमुंदरी मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा >> ‘आमदारकीसाठी राऊतांनी मनोहर जोशींचं घर जाळायला सांगितलं’; सदा सरवणकरांचा गौप्यस्फोट

2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीसह झालेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत सत्ता गमावल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांच्यावर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेशवर डझनाहून अधिक गुन्हे दाखल आहेत.

ADVERTISEMENT

हे सूडाचे राजकारण नाही, तर काय आहे?

2012 मध्ये आंध्र प्रदेशात काँग्रेसची सत्ता होती, तेव्हापासून चंद्राबाबू नायडू हे जगनमोहन रेड्डी यांचे शत्रू झाले. वडील वायएस राजशेखर रेड्डी विमान अपघातात मृत्यूमुखी पडल्यानंतर जगनमोहन रेड्डी यांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचे होते. आणि काँग्रेस तयार नसताना जगनमोहन रेड्डी यांनी बंडखोरी सुरू केली.

ADVERTISEMENT

मग राजशेखर रेड्डी सरकारच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली आणि तो अहवाल फुटला. खरे तर जगनमोहन यांच्या मालमत्तेच्या तपासाचा तपशीलही या अहवालात होता.

हेही वाचा >> NCP: अजित पवारांसह 40 आमदारांचं काय होणार, शरद पवारांनी ECI ला काय सांगितले?

अहवाल येताच टीडीपीने जगनमोहन रेड्डी यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्तेचा आरोप करत मोहीम सुरू केली. हा गोंधळ इतका वाढला की सीबीआय आणि ईडीने तपास सुरू केला आणि जगनमोहन रेड्डी यांना अटक करण्यात आली. 16 महिने तुरुंगात राहिल्यानंतर जगनमोहन रेड्डी सप्टेंबर 2013 मध्ये जामिनावर बाहेर येऊ शकले.

सत्तेत येताच जगनमोहन रेड्डी यांची कारवाई सुरू झाली. सर्वप्रथम अमरावतीत बांधलेल्या प्रजा वेदिका या करोडो रुपयांच्या इमारतीवर बुलडोझर धावला. कारवाईनंतर वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांनीही आनंद साजरा केला.

हेही वाचा >> INDIA Alliance : वाद टाळण्यासाठी फॉर्म्युला ठरला; वाचा मुंबई बैठकीची Inside Story

आपल्यावर होत असलेल्या कारवाईमुळे दु:खी झालेल्या नायडू यांनी सत्तेत परत येईपर्यंत विधानसभेत परतणार नसल्याचे जाहीर केले. यापूर्वी AIADMK नेत्या जे जयललिता आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही अशीच प्रतिज्ञा केली होती.

जगनमोहन रेड्डी विरोधी पक्षात असताना, टीडीपीच्या सदस्यांकडून खूप टोमणे मारले गेले होते, त्यानंतर ते विधानसभेतून बाहेर पडले आणि निवडणुका जिंकून मुख्यमंत्री झाल्यानंतरच परतले.

भाजपशी जवळीक राजकीय शत्रुत्वाला खतपाणी घालतेय?

चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेचा आंध्र प्रदेश भाजप अध्यक्ष डी.पुरंडेश्वरी यांनी निषेध केला आहे. एनटीआर यांची मुलगी असल्याने डी पुरंदेश्वरी याही नायडूंच्या नातेवाईक आहेत. भाजपप्रमाणेच जनसेना पक्षानेही नायडूंच्या अटकेला विरोध दर्शवला आहे.

नायडू यांची अटक अशा वेळी झाली आहे, जेव्हा ते एनडीएमध्ये परतणार असल्याची जोरदार चर्चा होती. या संदर्भात त्यांनी भाजप नेते अमित शाह यांच्याशी भेट घेतल्याचेही वृत्त आहे.

नायडूंप्रमाणेच पवन कल्याणही एनडीएमध्ये सामील झाल्याची जोरदार चर्चा आहे. नायडूंनी 2018 मध्ये भाजपशी संबंध तोडले होते. 2019 मध्ये आंध्र प्रदेशात लोकसभेच्या 22 जागा जिंकल्यानंतर जगनमोहन रेड्डी भाजपच्या जवळ आले आणि नायडू आणखी मागे राहिले.

हेही वाचा >> MOTN : शाह, गडकरी की योगी… मोदींचा उत्तम उत्तराधिकारी कोण? लोक म्हणतात…

जगनमोहन यांना भाजपने अनेक प्रसंगी पाठिंबा दिला, पण ते एनडीएमध्ये जाण्यास तयार नव्हते. आंध्र प्रदेशात आपले पाय रोवण्यासाठी भाजपला मजबूत भागीदाराची गरज होती. टीडीपीसोबत करार होऊ शकतो, असा विचार करून भाजपने आंध्र प्रदेशची कमान डी. पुरंदेश्वरी यांच्याकडे सोपवली होती.

अशा सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन जगनमोहन यांनी मजबूत खेळी आहे. नायडूंना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवल्यानंतर भाजपलाही विचारपूर्वक पुढे जावे लागणार आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर नायडूंचा बचाव करणे कठीण जाईल, हे जगनमोहन यांना चांगलेच समजले आहे.

जगनमोहन रेड्डी यांना भाजप आणि त्यांच्या नात्यात कोणीही घुसखोरी करावी असे का वाटेल? चंद्राबाबू नायडू भाजपमध्ये सामील झाले असते, तर जगनमोहन यांच्यासाठी ही राजकीय खेळी अडचणीची ठरली असती म्हणून त्यांनी आधीच राजकीय खेळी केली आणि भाजपची कोंडी केली आहे, असा अर्थ या अटकेचा लावला जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT