भाजप आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर इर्शाळवाडीची घटना टळली असती: अमित ठाकरे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Today's Irshalwadi incident would have been avoided if the ruling BJP was not busy split down MLAs. MNS leader Amit Thackeray has criticized the state government by making such a statement. See what leader Amit Thackeray actually said.
Today's Irshalwadi incident would have been avoided if the ruling BJP was not busy split down MLAs. MNS leader Amit Thackeray has criticized the state government by making such a statement. See what leader Amit Thackeray actually said.
social share
google news

मनीष जोग, जळगाव: सत्ताधारी भाजप (BJ) इतरांचे आमदार फोडण्यात व्यस्त नसती तर आजची इर्शाळवाळीची (Irshalwadi) घटना टळली असती. असं वक्तव्य करत मनसे (MNS) विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी सरकारवर निशाणा साधला. ते जळगावात (Jalgaon) बोलत होते. रायगड (Raigad) जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर आज दरड कोसळून त्यात आतापर्यंत 16 जण मृत्युमुखी पडल्याचं समोर आलं आहे. मात्र, सतत कोसळणाऱ्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याने संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास बचावकार्य थांबविण्यात आलं. (irshalwadi incident would have been avoided if bjp was not busy in split to party and mla mns amit thackeray news on maharashtra politics)

ADVERTISEMENT

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर मंत्रिमंडळाचे अनेक बडे नेते त्या ठिकाणी मदत करण्यासाठी दाखल झाले आहेत. परंतु, प्रत्येकवेळी घटना घडल्यावरच आपण जागे होतो. या संभाव्य घटनेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आधीच भाकीत केले होते. ते जर शासनाने गंभीरपणे घेतलं असतं तर आजची ही घटना घडली नसती असेही अमित ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

‘आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर, आज..’

‘अतिशय दुर्दैवी घटना आहे की, हे कुठे तरी मान्य केलंच पाहिजे. 200-250 लोकांचा मृ्त्यू होतो ही काय सोप्पी गोष्ट नाही, छोटी गोष्ट नाही.. साहेबांनी याआधीच सांगितलंय की, शासनाने लक्ष घालायला हवं होतं. त्यांचा अंदाज म्हणता येईल की नाही हे माहीत नाही मला.. पण त्यांना कसं कळतं… त्यांनी आधीच सांगितलं होतं.. पण हे सगळे आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर कुठे तरी लक्ष दिलं गेलं असतं. तुमचं लक्षच नसेल तर हे घडणारच..’ असं म्हणत अमित ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> Irshalwadiला पोहचलेल्या आदित्य ठाकरेंनी ‘असा’ दाखवला समजूतदारणा, म्हणाले…

जळगावात डिजेच्या तालावर अमित ठाकरेंचं स्वागत

महासंपर्क अभियानांतर्गत मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. खान्देशात दाखल होऊन नंदुरबार, धुळ्याचा दौरा करून अमित ठाकरे हे आज दुपारी जळगाव शहरात दाखल झाले. यावेळी जळगावच्या आकाशवाणी चौकात त्यांचं डीजेच्या तालात साडेतीन क्विंटलचा झेंडूच्या फुलांचा हार घालून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. विजयी घोषणा देत यावेळी आकाशवाणी चौकाचा परिसर कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला.

हे ही वाचा>> Irshalwadi Landslide : निसर्गासमोर टेकले हात! जिथे झाला मृत्यू, तिथेच होणार अंत्यसंस्कार, कारण…

खरं तर अशा प्रसंगी राजकीय नेत्यांनी संयमीपणा दाखवून कार्यकर्त्यांनी त्यांचा उत्साहीपणा दाखवू नये यासाठी समज देणं आवश्यक असतं. मात्र, जळगावमध्ये तसं काहीही घडल्याचं दिसून न आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ADVERTISEMENT

इर्शाळवाडीच्या घटनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

दरम्यान, इर्शाळवाडीच्या या दुर्घटनेवर राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका व्यक्ती केली.

ADVERTISEMENT

‘रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असं सांगण्यात येत आहे. ह्यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत इतकी इच्छा. जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काय मदत मिळेल हे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जरूर पाहावं. खरंतर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती, पण आत्ता इतकंच सांगतो की कुठे दरड कोसळू शकतात ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? असो. पुढे ह्यावर सविस्तर बोलेन पण आत्तातरी सगळे सुखरूप राहावेत हीच इच्छा.’ अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी यावेळी दिली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT