Irshalwadi Landslide : ‘गिरीशजी, सीएम आलेत म्हणून…’, अजित पवारांनी सुनावलं
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियंत्रण कक्षात जाऊन इर्शाळवाडी दरड दुर्घटनेची माहिती घेतली. पवारांनी गिरीश महाजन यांना कॉल केला. अधिकारी एकनाथ शिंदेंना भेटायला गेल्याचं कळल्यानंतर ते चिडले.
ADVERTISEMENT

irshalwadi landslide news : इर्शाळगडाच्या कुशीत वसलेल्या इर्शाळवाडीवर काळाने झडप घातली. बुधवारी (19 जुलै) रात्री 10 ते 11 वाजेच्या दरम्यान, दरड गावावर कोसळली आणि झोपेत असलेले अनेक जीव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मदत कार्य सुरू झालं. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर शिंदेंच्या भेटीसाठी अधिकारी इर्शाळवाडीतून खाली आल्याचे कळल्यानंतर अजित पवार चांगलेच चिडले. त्यांना ही नाराजी लपवता आली नाही आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांना अजित पवारांनी सौम्य शब्दात डोस दिला आणि अधिकाऱ्यांना सुनावलं.
इर्शाळवाडी झालेल्या दुर्घटनेची माहिती कळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी आठ वाजताच घडलेल्या ठिकाणीपासून जवळ असलेल्या ठिकाणी पोहोचले. इर्शाळवाडी सोडून काही लोक ज्या ठिकाणी थांबलेत. तिथे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाऊन चौकशी केली.
यावेळी एकनाथ शिंदे यांना अधिकाऱ्यांकडूनही माहिती घेतली आणि मदत व बचाव कार्यासंदर्भात सूचना दिल्या. पण, एकनाथ शिंदे गडाच्या खाली आल्याचे कळल्यानंतर मदत कार्य करत असलेले अधिकारीही खाली आले. हे अजित पवार यांना फोनवरून कळले आणि त्यांनी चांगलंच सुनावलं.