Ajit Pawar: दादा मुख्यमंत्री? मोहित कंबोज यांचे बोचणारे 8 शब्द, Tweet का केलं डिलीट?

मुंबई तक

ADVERTISEMENT

it takes 145 mla not 45 to become the chief minister bjp leader mohit kamboj taunt to ajit pawar by tweeting this
it takes 145 mla not 45 to become the chief minister bjp leader mohit kamboj taunt to ajit pawar by tweeting this
social share
google news

BJP Mohit Kamboj Tweet and Ajit Pawar: निलेश झाल्टे, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे मुख्यमंत्री (Chief Minister) होणार? अशी जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. असे होर्डिंग देखील अनेकदा आणि अनेक ठिकाणी लागल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र, या चर्चेनं भाजपमध्ये (BJP) अस्वस्थता असल्याचं आता अखेर समोर आलं आहे. जे भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या ट्वीटनंतर समोर आलं असून याबाबत आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. आता हे संपूर्ण प्रकरण काय हे आपण सविस्तरपणे समजून घेऊया. (it takes 145 mla not 45 to become the chief minister bjp leader mohit kamboj taunt to ajit pawar by tweeting this)

भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्री पदावरून पुन्हा जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. याचं कारण आहे मोहित कंबोज यांचं ट्वीट. ‘मुख्यमंत्री होण्यासाठी 45 नव्हे तर 145 आमदार लागतात.’ असं अत्यंत बोचरं ट्विट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलं होतं.

मोहित कंबोज यांनी केलेलं ट्वीट

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

लालबागच्या राजाच्या चरणी अजित पवारांच्या कार्यकर्त्यानं अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त करत चिठ्ठी अर्पण केल्याचं मीडियाच्या माध्यमातून समोर आलं. त्यानंतर तात्काळ मोहित कंबोज यांनी हे ट्वीट केलं. जे काही वेळानं डिलिट देखील करण्यात आलं.

हे ही वाचा >> शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरेंच्या वकिलाने मांडला गंभीर मुद्दा

अजित पवार पाच वेळा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. पण अजित पवारांचं मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्याचं स्वप्न अद्यापही पूर्ण होऊ शकलेलं नाही. त्यातच आता अजित पवार हे शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर ते मुख्यमंत्री होतील अशी सातत्याने चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तशीच त्यांच्या समर्थकांची देखील इच्छा आहे. त्यामुळेच कधी भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे बॅनर लागतात तर कधी जोरदार चर्चा सुरू होते. पण अद्यापही अजित पवारांना मुख्यमंत्री पद काही मिळवता आलेलं नाही. असं असतानाच आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्वीट करत थेट सत्तेत असलेल्या अजितदादांना डिवचलं आहे.

ADVERTISEMENT

जेव्हा या ट्विटची जोरदार चर्चा झाली तेव्हा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांने याची तात्काळ दखल घेतली. कारण पक्षश्रेष्टींनी तंबी दिल्यानंतर मोहित कंबोज यांनी ते ट्वीट डिलिट केली असल्याची चर्चा आहे.

ADVERTISEMENT

50 आमदार सोबत असलेले शिंदे झाले मुख्यमंत्री…

दरम्यान, मुख्यमंत्री होण्यासाठी 145 आमदार हवेत असं ट्वीट मोहित कंबोज यांनी जरी केलं असलं तरीही ते तंतोतंत बरोबर आहे असं म्हणता येणार नाही. ज्याचं उदाहरण आपल्या समोरच आहे. कारण अवघ्या 50 आमदारांना सोबत घेऊन आलेले एकनाथ शिंदे हे आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत.

हे ही वाचा >> Ajit Pawar : ‘अजितदादांना लवकर…’, लालबागच्या राजाला साकडं, ‘चिठ्ठी’त काय?

असं असतानाही मोहित कंबोज यांनी हे ट्वीट नेमकं कोणासाठी आणि काय मेसेज देण्यासाठी ट्वीट केलंय याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT