‘मला कानात जरी सांगितले असते ना…’, जयंत पाटलांचा अजित दादांना चिमटा

मुंबई तक

ADVERTISEMENT

jayant patil criticize ajit pawar on state president sharad pawar maharashtra politics
jayant patil criticize ajit pawar on state president sharad pawar maharashtra politics
social share
google news

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका जाहीर सभेत जयंत पाटलांच्या (Jayant Patil) प्रदेशाध्यक्ष पदावर भाष्य केले होते. या घटनेचाच संदर्भ घेत आता जयंत पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. ”मला कानात जरी सांगितले असते ना”, ”मला व्हायचंय”. ”याच ठिकाणी भाषण करून सांगितले असते”, असा चिमटाच आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना अजित दादांना काढला आहे. जयंत पाटील व्हाय बी सेंटरमधून बोलत होते.(jayant patil criticize ajit pawar on state president sharad pawar maharashtra politics)

मला कानात जरी सांगितले असते ना, मला व्हायचंय. याच ठिकाणी भाषण करून थेट सांगितले असते, असा चिमटाच जयंत पाटील यांनी अजित पवारांना काढला आहे. मला बस झालंय आता, अजून कोणाला तरी द्या, माझी काही हरकत नाही, असे देखील जयंत पाटील म्हणाले आहेत. तसेच जाहिर सभेत अशा चर्चा करायच्या नसतात. त्या जाहिर सभेत चर्चा करण्याचा प्रघात, आमच्या सभेत पडलेला म्हणून सांगतो, असे देखील जयंत पाटील म्हणाले.

हे ही वाचा : NCP: भुजबळ म्हणाले बडव्यांनी घेरलं, अमोल कोल्हेंचा पलटवार

जयंत पाटील यांनी छगन भुजबळांच्या टीकेचा देखील समाचार घेतला. विठ्ठलाच्या सभोवताली बडवे आहेत.ते आम्हाला भेटून देत नाही असे आता सांगतात, असा भुजबळांच्या विधानाचा संदर्भ घेत जयंत पाटील यांनी दोन किस्से सांगितले. 2 वर्ष तुरूंगवास भोगून पुण्याला आगमन झाले, त्यावेळी महात्मा फुलेंच्या विचारांची फुले पगडी तुम्ही त्यांच्या डोक्यावर ठेवली. त्यावेळी बडवे आड़वे नाही आले का? असा सवालच जयंत पाटील यांनी भुजबळांचे नाव न घेता केला. त्या फुलेंच्या पगडीच्या खालील तुमच्या डोक्यातून ज्योतीराव फुलेंचा विचार निघून गेला, तुम्ही फुलेंचा विचार काढून टाकलात आणि ज्यांनी ज्योतिराव फुले आणि सावित्री देवींची चेष्ठा केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात अशी टीका जयंत पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जयंत पाटील पुढे म्हणाले, बडवे जर आडवे येत होते. तर 2019 ला सरकार स्थापण झाल्यावर उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडाळात शऱद पवारांनी पहिली दोन नावे दिली. त्या दोन नावात छगन भूजबळांचे नाव होते. त्यावेळी बडवे आडवे आले नाही का? असा सवाल देखील पाटील यांनी भुजबळांना केला.

इथला प्रत्येक कार्यकर्ता स्वत:च्या खिशातला पैसा देऊन आलाय. कुणाला बांधुन ठेवून येथे आणले नाही, गाड्या देऊन वाहतूकीची व्यवस्था करून आम्ही कोणाला येथे आणले नाही, असा टोला देखील जयंत पाटलांनी अजित पवारांना मारला. तसेच ते का गेले यांची विवंचना आम्ही करत नाही, कोणाच्या तरी अडचणी असतील, कोणाचे तरी प्रश्न असतील, कोणावर प्रसंग आले असतील, या सर्व काळात तुमच्या मागे उभे राहण्याचे काम पवार साहेबांनी केले आहे.ज्याचे अनिल देशमुख उदाहरण आहेत, असे देखील जयंत पाटील म्हणाले. तसेच येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी त्यांच्या स्वप्नातला सक्षम असा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष उभा करून दाखवून या, त्यासाठी सर्वांनी कामाला लागा, असा विश्वास देखीत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये भरला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : BJPच्या मदतीने मंत्री होताच छगन भुजबळांनी शरद पवारांना सुनावलं.. सगळा इतिहासच काढला!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT