NCP: प्रफुल पटेलांकडून नियुक्त्या! आव्हाडांनी शरद पवारांचं थेट पत्रच काढलं, म्हणाले…
राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी नुकतीच पत्रकार परीषद घेऊन सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी, अजित पवार यांची गटनेतेपदी आणि अमित पाटील यांची प्रतोदपती नियुक्ती केली. या नियुक्तीनंतर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परीषद घेऊन या नियुक्त्यांवर प्रतिक्रिया दिली.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी नुकतीच पत्रकार परीषद घेऊन सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी, अजित पवार यांची गटनेतेपदी आणि अमित पाटील यांची प्रतोदपती नियुक्ती केल्याची घोषणा केली. या नियुक्तीनंतर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परीषद घेऊन या नियुक्त्यांवर प्रतिक्रिया दिली. काही जणांनी राष्ट्रवादीच्या वतीने पत्रकार परीषद घेतली ती आम्ही पाहिली, यामध्ये एक प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट आणि डेप्युटी प्रेसिडेंट निवडल्याची खिल्ली जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी उडवली. (jitendra Awhad criticize praful patel sharad pawar letter sunil tatkare maharashtra politics)
ADVERTISEMENT
जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना निलंबित करणारे शरद पवारांचे पत्रच पत्रकार परीषदेत दाखवले. अजित पवार यांनी केलेल्या नियुक्त्या कायदेशीर आहेत का? जर शरद पवारांनी पक्षातून निलंबित केले आले असताना तु्म्ही कशा नियुक्त्या करू शकता, असा सवाल आव्हाड यांनी अजित पवार यांना केला. तसेच
जर तुम्ही वर्कींग प्रेसिंडेंट असलात तरी तुम्हाला कायदेशीर रित्या मान्यताच नाही, तुम्ही कोणत्याच नेमणूका करू शकत नाही. पण तरी जर मान्य केले तरी तुम्हाला पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. हे शरद पवार साहेबांचे पत्र असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले.
शरद पवार यांच्या या लेटरमधला मसूदा देखील जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी वाचुन दाखवला. पक्ष अध्यक्षापासून लपवून आपण 9 आमदारांना पक्ष विरोधी कारवाया करण्यासाठी प्रवृत्त करत होते. त्यामुळे शऱद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटले यांना निलंबित केले आहे. त्यामुळे जर तुम्ही शरद पवार यांना अध्यक्ष मानत असाल तर त्यांनी केलली कारवाई मान्य करणार की नाही,असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच नेत्यांना फक्त एकच संधी आहेत, पवार साहेबांशी संपर्क साधून आम्ही तुमच्यासोबत आहे, हे सांगा असे देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT