Kangana Ranaut: 'यापुढे 'त्यावर' अजिबात बोलायचं नाही' भाजपने कंगनाला सगळ्यांसमोर का सुनावलं?

मुंबई तक

Kangana Ranaut on Farmer Protest: कंगना रणौत एक मुलाखत दिली होती.या मुलाखतीत शेतकरी आंदोलनावर बोलताना कंगना रणौतने मोठं विधान केले होते. ''शेतकरी आंदोलनावेळी देशाचं नेतृत्व मजबूत नसतं तर या लोकांनी पंजाबमध्ये बांग्लादेशसारखी परिस्थिती निर्माण केली असती''असे विधान कंगना रणौतने केले होते.

ADVERTISEMENT

भाजपनेच दिला घरचा आहेर
kangana ranaut controversial statement on farmer protest bjp expresses diagreement emergency release
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शेतकरी आंदोलनावर कंगना रणौतचं मोठं विधान

point

कंगनाच्या या विधानानंतर काँग्रेसची कारवाईची मागणी

point

भापजचा कंगनाला घरचा आहेर

Kangana Ranaut on Farmer Protest: बॉलिवूडची क्वीन आणि भाजप खासदार कंगना रणौत ही तिच्या स्पष्टोवक्तेपणामुळे नेहमीच ओळखली जाते. या तिच्या सवयीने ती अनेकदा वादात देखील सापडली आहे.त्यात आता दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनावर (Farmer Protest) कंगना रणौतने (Kangana Ranaut)  मोठं विधान केले आहे. या विधानानंतर भापजने हे कंगनाचे वैयक्तिक मतं असून पक्षाच्या याच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शेतकरी आंदोलनावर विधान करून कंगना तोंडघशी पडली आहे. (kangana ranaut controversial statement on farmer protest bjp expresses diagreement emergency release) 

कंगना रणौत एक मुलाखत दिली होती.या मुलाखतीत शेतकरी आंदोलनावर बोलताना कंगना रणौतने मोठं विधान केले होते. ''शेतकरी आंदोलनावेळी देशाचं नेतृत्व मजबूत नसतं तर या लोकांनी पंजाबमध्ये बांग्लादेशसारखी परिस्थिती निर्माण केली असती''असे विधान कंगना रणौतने केले होते. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : दुसऱ्या टप्प्यात 50 लाख 'लाडक्या बहिणीं'ना मिळणार लाभ, तुमचं नाव आहे का?

कंगनाच्या या विधानानंतर पंजाबचे  काँग्रेस नेते राजकुमार वेरका चांगलेच आक्रमक झाले होते. ''कंगना सातत्याने शेतकऱ्यांवर अशी विधाने करत आहे. तिच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात यावा तिच्यावर एनएसए लादण्यात यावा'', अशी मागणी त्यांनी केली होती. तसचे कंगनाने शेतकऱ्यांना बलात्कारी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी तिच्यावर कारवाई करतील किंवा साध्वी प्रज्ञाप्रमाणे तिलाही वाचवले जाईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली होती. 

भापजने निवेदन केले जारी 

भाजपने कंगनाच्या वक्तव्यापासून दूर राहून हे तिचे वैयक्तिक मत असून पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. भाजपच्या केंद्रीय माध्यम विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "कंगना रणौतचे विधान हे पक्षाचे मत नाही. भारतीय जनता पक्ष कंगना रणौतच्या या विधानावर असहमती व्यक्त करतो.  पक्षाच्या वतीने, कंगना राणावत यांना पक्षाच्या धोरणात्मक मुद्द्यांवर विधाने करण्याची परवानगी किंवा अधिकृतता नाही, असं भाजपने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp