Yavatmal News : शिंदेंच्या भाषणा दरम्यान 'लाडक्या बहिणीं'नी घातला गोंधळ, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Yavatmal Rally : यवतमाळच्या किन्हीमध्ये आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महिलांना संबोधित करत असताना, काही महिलांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे काही क्षणासाठी सभेत गोंधळ उडाला होता.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुख्यमंत्री शिंदेंचे भाषण सूरू असताना महिलांचा गोंधळ
यवतमाळच्या सभेत घडला प्रकार
आंदोलक महिलांनी पोलिसांनी सभेबाहेर नेलं
Eknath Shinde Rally : भास्कर मेहरे, यवतमाळ, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या योजनेचा
प्रचार प्रसार करण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते आहे. आज असाच कार्यक्रम यवतमाळच्या (Yavatmal) किन्ही भागात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांचे भाषण सूरू असताना महिलांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ (Video Viral) देखील समोर आला आहे. त्यामुळे शिंदेंच्या सभेत नेमकं काय घडलंय? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana cm eknath shinde sabha yavatmal women protest for farmer demand video viral yavatmal story)
ADVERTISEMENT
यवतमाळच्या किन्हीमध्ये आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महिलांना संबोधित करत असताना, काही महिलांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे काही क्षणासाठी सभेत गोंधळ उडाला होता.
हे ही वाचा : Viral Video: गोविंदा, गोविंदा... पुणेकरांचा विषयच हार्ड, सोन्याचा चष्मा अन् 25 किलो सोनं घालून बालाजीच्या चरणी!
मुख्यमंत्री शिंदे यांचे भाषण सूरू असताना अचानक काही महिलांनी जोरजोरात घोषणाबाजी द्यायला सुरूवात केली. 'शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा', 'शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा' अशा शब्दात त्यांनी सभास्थळ दणाणून सोडलं. त्यामुळे महिलांच्या अचानक घोषणा ऐकूण सभेत एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर सभेस्थळी असलेल्या पोलिसांनी तत्काळ महिलांना सभेबाहेर केले होते. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर महिला काही थांबल्या नाही, त्याच्याच घोषणा या सूरूच होत्या.
हे वाचलं का?
मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
'आधी सरकारी काम आणि 6 महिने थांब' असा प्रकार होता.त्यामुळे लोक कंटाळून लाभ सोडून द्यायचे. पण आज महायुती सरकारने लोकांना जे हवं ते दिलं आहे. 1 कोटी 7 लाख बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले,त्यामुळे तुमचं अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. तसेच विरोधक ही योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र ही योजना कायम स्वरुपी चालू राहणार घेणार नाही. हे देणारं सरकार आहे घेणारे नाही. आता 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय आपण घेतला असे देखील शिंदे यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'त्या' महिलांच्या खात्यात पुन्हा 3000 होणार जमा, सरकारने घेतला मोठा निर्णय
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT