Devendra Fadnavis: ‘पाटील तर शिवसेनेचा…’ ललित पाटील प्रकरणी फडणवीसांचा ठाकरेंवर मोठा आरोप
Lalit Patil: ड्रग्स प्रकरणातील आरोपी ललित पाटीलबाबत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. अटक केल्यापासून ललित पाटील याची चौकशीच करण्यात आली नाही. ज्याला ठाकरे सरकार जबाबदार असल्याचं विधान फडणवीसांनी केलं.
ADVERTISEMENT
Devendra Fadnavis on Lalit Patil Case: मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (20 ऑक्टोबर) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यावरच तुफान टीका केली. पण याच पत्रकार परिषदेत ड्रग्स प्रकरणातील आरोपी ललित पाटील (Lalit Patil) याच्याविषयी जेव्हा फडणवीसांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी याबाबत आपण आज फक्त एकच गोष्ट सांगणार आहोत. सर्व माहिती योग्य वेळी सांगू असं विधान केलं. (lalit patil was an office bearer of shiv sena devendra fadnavis made a big accusation against thackeray group in lalit patil case)
ADVERTISEMENT
यावेळी पुन्हा एकदा फडणवीसांनी ललित पाटीलविषयी ठाकरे गटालाच जबाबदार धरलं. ललित पाटील हा नाशिकमध्ये ठाकरे गटाचाच पदाधिकारी होता. असं म्हणत फडणवीसांनी या प्रकरणी सध्याच्या सरकारची काही भूमिका नसल्याचं विधान केलं आहे.
पाहा ललित पाटीलबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले:
‘मी ललित पाटील प्रकरणावर बोललो तर मी मुख्य ज्यासाठी पत्रकार परिषद घेतलीय ते तुम्ही सोडून द्याल. एकच गोष्ट सांगतो फक्त त्यातली. बाकी सगळ्या गोष्टी नंतर आणणारच आहे यातल्या. एकच गोष्ट सांगतो यातली.’
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Samruddhi Mahamarg : वेगात बस अन् चालक मोबाईलवर पाहतोय कार्यक्रम; पहा Video
‘ललित पाटील याला अटक झाली 10-11 डिसेंबर 2020 रोजी. ज्यावेळेस अटक झाली त्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सत्तेत होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी ललित पाटीलला नाशिकचं शिवसेनेचं प्रमुख केलं होतं. त्यावेळेस ते उद्धव ठाकरे यांचे नाशिकचे शिवसेनेचे अध्यक्ष होते. आता आश्चर्य बघा की, त्यांना अटक झाल्यानंतर पीसीआर मागितला.’
‘निश्चित गुन्हा मोठा होता. त्यामुळे 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. त्यानंतर तो तात्काळ ससूनला दाखल झाला आणि पूर्ण 14 दिवस तो ससूनमध्येच दाखल होता. सरकारी पक्षातर्फे कोर्टाला अर्जही करण्यात आला नाही की, आम्ही यांची चौकशी केलेली नाही किंवा यांचा आजार काही बरोबर नाहीए. अर्जही केला नाही.’
’14 व्या दिवशी त्याचा पीसीआर संपल्याने त्याचा एनसीआर करून टाकला. ज्यावेळेस आम्ही या गुन्ह्यात आतपर्यंत जातोय तेव्हा गुन्हेगाराची चौकशीच झालेली नसल्याचं समजतं आहे. उद्या जर याच्या विरुद्ध केस उभी करायची असेल तर उभी राहणारच नाही. कारण चौकशीच केली नाही.’
‘आता माझा सवाल आहे की, ललित पाटीलची चौकशी का केली नाही? कोण जबाबदार होतं? तेव्हाचे मुख्यमंत्री, गृहमंत्री नेमकं कोण जबाबदार होतं. कोणाच्या दबावामुळे हे सगळं झालं? कोणाचे संबंध होते? अजून खूप गोष्टी आहेत. पण आज सांगणार नाही.’ असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
हे ही वाचा >> एक नाव, दोन व्होट बँक; प्रमोद महाजनांच्या नावे योजना लाँच करण्याच काय आहे कहाणी?
दुसरीकडे शिवसेना (UBT) च्या वतीने याच प्रकरणी नाशिकमध्ये एक मोर्चा काढण्यात येत आहे. तर दुसरीकडे फडणवीस ठाकरे गटावरच आरोप करतआ आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण नेमकं काय वळण घेतं हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT