Latur Waqf Board Notice : लातूरमध्ये 100 हून अधिक शेतकऱ्यांच्या जमिनीवर वक्फचा दावा? काय आहे खळबळजनक प्रकरण?

मुंबई तक

शनिवारी हे प्रकरण समोर आलं असून, कित्येक पिढ्यांपासून शेती करत असलेल्या जमिनीवर वक्फ बोर्ड दावा करत असल्याचं त्या शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वक्फ बोर्डाचा शेतकऱ्यांच्या जमिनींवर दावा?

point

लातूरमध्ये नेमकं काय घडलं?

Latur Waqf Boad Notice : लातूर जिल्ह्यातील 100 हून अधिक शेतकऱ्यांनी वक्फ बोर्डाकडून जमीन हडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. शनिवारी हे प्रकरण समोर आलं असून, कित्येक पिढ्यांपासून शेती करत असलेल्या जमिनीवर वक्फ बोर्ड दावा करत असल्याचं त्या शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा  >> CM Devendra Fadnavis : "...म्हणून सर्वात जास्त मराठा आमदार भाजपमधून झाले", फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणात हा दावा दाखल करण्यात आला असून, एकूण 300 एकर जमीन असलेल्या 103 शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या शेतकऱ्यांपैकी एक असलेल्या तुकाराम कानवटे यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीमध्ये म्हटलंय की "या जमिनी पिढ्यानपिढ्या आम्हाला वारसाहक्काने मिळाल्या आहेत. या वक्फ मालमत्ता नाहीत. महाराष्ट्र सरकारने आम्हाला न्याय द्यावा, अशी आमची इच्छा आहे." दरम्यान, या प्रकरणी न्यायालयात दोन सुनावण्या झाल्या आहेत आणि पुढील सुनावणी 20 डिसेंबरला आहे.

हे ही वाचा >>'सदा सरवणकरांचा माज उतरवायचा होता, तो माज आज उतरवला', ठाकरेंच्या आमदाराची थेट टीका

वक्फ बोर्डाच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी आणि त्यांच्या मालमत्तेचे कार्यक्षम व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने वक्फ (दुरुस्ती) विधेयक यावर्षी 8 ऑगस्ट रोजी लोकसभेत सादर केले होते. हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठवण्यात आले आहे.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp