'सदा सरवणकरांचा माज उतरवायचा होता, तो माज आज उतरवला', ठाकरेंच्या आमदाराची थेट टीका
Mahesh Sawant vs Sada Sarvankar: शिवसेना UBT चे आमदार महेश सावंत यांनी शिवसेना नेते सदा सरवणकर यांच्यावर जहरी टीका केली आहे. जाणून घ्या महेश सावंत नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आमदार महेश सावंतांची शिवसेना नेते सदा सरवणकर यांच्यावर जहरी टीका
सावंतवाडीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सरवणकरांवर टीका
महेश सावंतांनी सिंधुदुर्गमध्ये काम करण्याची इच्छाही केली व्यक्त
Mahesh Sawant: सावंतवाडी: 'बाळासाहेब ठाकरेंनी ज्या दगडाला शेंदूर फासला त्या ३० वर्ष राजकारणात असलेल्या सदा सरवणकर यांचा माज उतरवायचा होता. तो माज आज उतरवला.' अशी घणाघाती टीका शिवसेना (UBT) पक्षाचे माहीमचे आमदार महेश सावंत यांनी केली. सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (shiv sena ubt mla mahesh sawant made scathing criticism of sada saravankar)
सावंतवाडीमधील आपल्या मूळ गावी यात्रेला गेलेले असताना महेश सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सदा सरवणकरांवर जोरदार टीका केली.
आमदार महेश सावंत नेमकं काय म्हणाले?
'गद्दारीचा शाप शिवसैनिकांनी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुसून टाकला.' असे मत नवनिर्वाचित आमदार महेश सावंत यांनी व्यक्त केले. तसेच कोकणची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी दिली तर स्वीकारेनच, नाही दिली तरीही इथल्या शिवसैनिकांना ताकद देईन. असा विश्वास महेश सावंत यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा>> Bhaskar Jadhav : विरोधी पक्षाच्या आमदारांकडून शपथविधीवर बहिष्कार! भास्कर जाधवांनी सांगितलं खरं कारण
आमदार महेश सावंत म्हणाले, 'गावात घोडेमुखाचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो. देवावर माझी श्रद्धा असून आजवर कधीही यात्रा चुकवली नाही. उद्या आदित्य ठाकरे यांच्यासह बैठक आहे. त्यानंतर आमदारांच्या शपथविधीविषयी निर्णय होईल.'










