Lok Sahba 2024: “मविआला 31 ते 33, तर महायुतीला 15 ते 17 जागा मिळणार”

भागवत हिरेकर

Lok Sabha election prediction : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीला किती जागा मिळतील, याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी मोठं राजकीय भाकित केले आहे.

ADVERTISEMENT

Lok sabha election 2024 Prediction jitendra awhad tweet
Lok sabha election 2024 Prediction jitendra awhad tweet
social share
google news

2024 lok sabha election prediction : लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. 2024 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा गुलाल उधळण्यासाठी भाजपकडून परिश्रम घेतले जाताहेत. दुसरीकडे दोन गटात विभागल्या गेलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही मोर्चेबांधणी सुरू केलीये. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लोकसभा निवडणुकीतील निकालाबद्दल मोठं भाकित केलं आहे.

लोकसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून पक्ष बळकटी आणि लोकसभा मतदारसंघ बांधणीवर लक्ष केंद्रीत केलं जात आहे. लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला वा आघाडीला किती यश मिळू शकतं, याचेही अंदाजे बांधले जात आहेत.

महायुतीला 15 ते 17 जागा मिळणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलंय. दिल्लीतील सट्टाबाजारातील चर्चेचा हवाला देत आव्हाडांनी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीबद्दल हे राजकीय भाकित केलं आहे.

जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय की, “दिल्लीच्या राजकीय सट्टा बाजारात आज सहज काही लोकांशी बोलत होतो. महाराष्ट्राच्या बाबतीतले त्यांचे अंदाज ऐकून मला स्वत:लाच धक्का बसला. त्यांचे म्हणणे आहे की, महाविकास आघाडीला 31 ते 33 जागा मिळतील आणि महायुती (भाजपा, एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट) यांना 15 ते 17 जागा मिळतील.”

हे वाचलं का?

    follow whatsapp