Appasaheb Dharmadhikari : पुरस्कार 25 लाखांचा, अन् खर्च 14 कोटींचा; शिंदे सरकारचा अजब कारभार
Appasaheb Dharmadhikari : श्री संदस्यांच्या निधनावरून आणि कार्यक्रमाच्या वेळेवरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरले असतानाच, सरकारने या पुरस्कार सोहळ्यासाठी तब्बल 14 कोटी रूपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या खर्चावरून सुद्धा आता विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
25 lakhs costing of maharashtra bhushan government use 14 crores : ज्येष्ठ निरुपणकार डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना रविवारी महाराष्ट्र भूषण (maharashtra bhushan) प्रदान करण्यात आला. नवी मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमात 12 श्री संदस्यांचा उष्मा घातामुळे दुदैवी मृत्यू झाला होता. या श्री संदस्यांच्या निधनावरून आणि कार्यक्रमाच्या वेळेवरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरले असतानाच, आता या कार्यक्रमासाठी खर्च केलेल्या रक्कमेची माहिती समोर आली आहे. सरकारने या पुरस्कार सोहळ्यासाठी तब्बल 14 कोटी रूपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या खर्चावरून सुद्धा आता विरोधक (Opposition leader) सरकारला घेरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.(maharashtra bhushan award prizing 25 and governmenyt use 14 crore for event opposition leader can target government)
ADVERTISEMENT
कार्यक्रमावर सरकारचा किती खर्च?
नवी मुंबईच्या खारघर य़ेथील सेंट्रल पार्क परिसरात राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण (maharashtra bhushan) पुरस्कार सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी गृहमंत्री अमित शहा (Amit shah) देखील दिल्लीतून मुंबईत आले होते. त्यामुळे साहजिकच कार्यक्रम भव्यदिव्य होणारच होता. या कार्यक्रमात ज्येष्ठ निरुपणकार डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण (maharashtra bhushan) प्रदान करण्यात आला होता.या पुरस्काराची एकूण रक्कम 25 लाख होती. तर आता भव्य दिव्य कार्यक्रमासाठी राज्य सरकारने 13 कोटी, 62 लाख 51 हजार रूपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. या खर्चामुळे सरकार अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे ही वाचा : महाराष्ट्रात राजकारण पेटलं, 12 श्री सदस्यांच्या मृत्यूवर अखेर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सोडलं मौन
हे वाचलं का?
राज्यात एकीकडे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. राज्य सरकारकडून नुकसान भरपाई मिळेल याकडे आशेने नुकसानग्रस्त शेतकरी पाहत आहेत.त्यामुळे एकीकड़े शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न देता, दुसऱीकडे एका कार्यक्रमासाठी 14 कोटींची उधळण सुरु असल्याच्या मुद्यावरून विरोधक राज्य सरकारला टार्गेट करण्याची शक्यता आहे.
मृत पावलेल्या व्यक्तींची नावे
हे ही वाचा : आप्पासाहेब धर्माधिकारींची ‘श्री समर्थ बैठक’ म्हणजे काय.. लाखो श्रीसेवक त्यांना का मानतात?
1) महेश नारायण गायकर (वय 42, गाव- वडाळा, मुंबई, मूळ गाव – म्हसळा मेहंदडी)
2) जयश्री जगन्नाथ पाटील (वय 54, गाव – म्हसळा, रायगड)
3) मंजुषा कृष्णा भोंबंडे (वय 51, गाव – गिरगाव मुंबई मुळगाव श्रीवर्धन)
4) स्वप्निल सदाशिव केणी (वय 30, गाव – शिरसाट बामन पाडा विरार)
5) तुळशीराम भाऊ वांगड (वय 58, गाव -जव्हार पालघर)
6) कलावती सिद्राम वायचळ (वय 45, गाव – तोडकर आळी सोलापूर)
7) सविता संजय पवार (गाव – मंगळवेढा सोलापूर)
8) भीमा कृष्णा साळवे (वय 58, गाव – कळवा ठाणे)
9) पुष्पा मदन गायकर (वय 64 वर्ष गाव – कळवा ठाणे
10) वंदना जगन्नाथ पाटील (वय 62 वर्ष गाव- करंजाडे
11) अनोळखी महिला (वय 50 ते 55 वर्ष)
ADVERTISEMENT
दरम्यान एकूण 11 मृतदेहांपैकी 10 मृतदेह वारसाच्या ताब्यात देण्यात आले आहेत. तर एक मृतदेह बेवारस असून महिलेचा आहे वारसाचा शोध चालू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT