Maharashtra Budget 2024 : शिंदे सरकारच्या 'या' घोषणांची चर्चा, बजेटमध्ये काय?
Maharashtra Budget 2024 News : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात दुर्बल घटकांसाठी देखील घोषणा करण्यात आल्या आहेत.या घोषणा नेमक्या काय आहेत? हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे.
Maharashtra Budget 2024, Ajit Pawar : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी, कामगार, तरूण, महिला यासह सर्व वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात दुर्बल घटकांसाठी देखील घोषणा करण्यात आल्या आहेत.या घोषणा नेमक्या काय आहेत? हे जाणून घेऊयात. (maharashtra budget 2024 big announcement for weaker section ajit pawar budget 2024)
ADVERTISEMENT
दुर्बल घटकांसाठी विविध योजना
- ‘सर्व स्वरुपातील सार्वत्रिक दारिद्रय नाहीसे करणे’ हे शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याचा निश्चय
- संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून निराधार, विधवा, दिव्यांग तसेच वृध्द नागरिकांच्या दरमहा अर्थसहाय्यात वाढ- एक हजारावरुन दीड हजार रुपये अशी वाढ - सन 2023-24 मध्ये 45 लाख 60 हजार लाभार्थींना 7 हजार 145 कोटी रुपये अनुदानाचे वाटप
- पान, पानपिंपरी आणि मुसळीचे उत्पादन करणाऱ्या बारी समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना
- नव्याने निर्माण करण्यात आलेल्या तसेच कार्यरत महामंडळांसाठी निधीची पुरेशी तरतूद
हे ही वाचा : लोकसभेत महायुतीला रडवलं! कांद्याबाबत बजेटमध्ये काय निर्णय झाला?
- दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना’ - पहिल्या टप्प्यात 34 हजार 400 घरकुल बांधणार-
- दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रीक वाहनाचे वाटप करणार
- तृतीयपंथी धोरण-2024 जाहीर-भरती प्रक्रियेमध्ये तसेच सर्व शासकीय योजनांमध्ये स्त्री-पुरुषांसोबतच ‘तृतीयपंथी’ हा लिंग पर्याय उपलब्ध-तृतीयपंथीयांना राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेणे सुलभ
- धनगर समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांसाठी खारघर, नवी मुंबई येथे 4 हजार चौरस मीटरचा भूखंड
- महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण महामंडळामार्फत नोंदणीकृत घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना
- मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांकरीता कर्जावरील शासन हमीची मर्यादा ३० कोटी रुपयांवरून ५०० कोटी रुपये
- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व कुटुंबांना लागू
- आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम प्रतिकुटुंब १ लाख ५० हजार रुपयांवरून ५ लाख रुपये - एक हजार 900 रुग्णालयांमार्फत एक हजार 356 प्रकारचे उपचार उपलब्ध
- ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ३४७ ठिकाणी कार्यान्वित
हे ही वाचा : प्रत्येक कुटुंबाला मिळणार 3 मोफत गॅस, अर्थमंत्र्याकडून अन्नपूर्णा योजनेची घोषणा
- पतसंस्थांच्या स्थिरीकरण व तरलतेसाठी 100 कोटी रुपये निधी
- प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी, पारधी व आदिम आवास योजना, मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनांच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात 35 लाख 40 हजार 491 घरकुल बांधण्यात येणार
- सन 2024-25 मध्ये विविध घरकुल योजनांकरीता 7 हजार 425 कोटी रुपयांची तरतूद
- बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गिरणी कामगारांना 12 हजार 954 सदनिका वितरित-उर्वरित सदनिका उपलब्ध करुन देण्याचे नियोजन
- सन 2024-25 साठी स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 1 हजार 886 कोटी 84 लाख निधीची तरतूद
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT