विधान परिषद निवडणूक: 'या' नावांची जोरदार चर्चा, पण भाजप वापरणार धक्कातंत्र?
विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून अनेक उमेदवारांची नावं चर्चेत आहेत. पण यावेळी ते पुन्हा धक्कातंत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाच रिक्त जागांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 मार्च आहे. तर निवडणुका 27 मार्च रोजी होणार आहेत. विरोधी पक्षांसाठी पुरेसा मतांचा कोटा नसल्याने, महाविकास आघाडी या निवडणुकीत जवळजवळ नसल्याचं दिसून येत आहे. मात्र, दुसरीकडे महायुतीमधील प्रत्येक पक्षात जोरदार स्पर्धा वाढली आहे. तीनही पक्षातील नेते विधान परिषदेची आमदारकी मिळावी यासाठी सध्या जोरदार प्रयत्न करत आहेत.
महाआघाडीत भाजपला तीन, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांना प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. हे तिन्ही पक्ष महाराष्ट्राच्या महायुती सरकारचा भाग आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत.
हे ही वाचा>> Dhananjay Munde यांच्या राजीनाम्यानंतर कुणाची अडचण, कुणाला संधी, मंत्रिपद कुणाला?
भाजप पुन्हा एकदा वापरणार धक्कातंत्र?
आतापर्यंत अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये भाजप उमेदवार देताना कायमच धक्कातंत्राचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे. खरं तर सध्या राजकीय वर्तुळात दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. पण भाजपचा इतिहास लक्षात घेता काही अनपेक्षित नावं देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात.
'या' तीन नावाची जोरदार चर्चा
1. दादाराव केचे - माजी आमदार आर्वी विधानसभा मतदारसंघ. देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखडे यांना या क्षेत्रातून संधी मिळाल्याने केचे यांचे पुनर्वसन करण्यात येऊ शकते.