Maharashtra Politics: अजित पवार की एकनाथ शिंदे… भाजपला कोण ठरतंय डोकेदुखी?

अनुजा धाक्रस

ADVERTISEMENT

maharashtra politics dcm ajit pawar or eknath shinde who is giving headache to bjp
maharashtra politics dcm ajit pawar or eknath shinde who is giving headache to bjp
social share
google news

Ajit Pawar and Eknath Shinde BJP: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर आरोप करून मविआ सरकारमधून बाहेर पडलेल्या शिंदे गटाला शिंदे सरकारमध्येच अजित पवारांना घ्यावं लागलं, शिवसेनेच्या (Shiv Sena) हरकतीनंतरही अजित पवारांना अर्थ खातं मिळालं, स्वत:चे आमदार वेटिंग लिस्टवर असतानाही राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं स्वागत करावं लागलं, पण पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मात्र शिंदेंनी शिवसेनेला खुश केलं. महायुतीत अजित पवारांचं स्थान काही घटनांमुळे अधोरेखित होऊ लागलं आहे. पण या सगळ्यामुळे भाजपची (BJP) चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. (maharashtra politics dcm ajit pawar or eknath shinde who is giving headache to bjp)

ADVERTISEMENT

शिंदेंनी परतीचे दोर कापले

भाजपसाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामधला सगळ्यात मुख्य फरक आहे तो म्हणजे परतीचे दोर कुणी कापलेत ह्याचा. उद्धव ठाकरेंशी पंगा घेऊन एकनाथ शिंदेंनी त्यांच्याकडे परतीचे दोर पूर्णत: कापले आहेत. पण अजित पवारांनी जरी पक्षावर ताबा, राष्ट्रीय अध्यक्षपदावर दावा केला असला तरी पवारांशी त्यांनी संबंध तोडलेले नाहीत.

शिंदे-ठाकरेंमध्ये कौटुंबिक किंवा रक्ताचं नातं नाही, दादा-पवारांमध्ये मात्र ते आहे. कौटुंबिक भेटी जरी बाजूला ठेवल्या तरी अजित पवार आपले आमदार-मंत्र्यांना घेऊन शरद पवारांना भेटायला गेले. शिंदे ठाकरेंवर जहरी टीका करतात पण तेच अजित पवार मात्र एक अवाक्षर पवारांविरोधात बोलत नाहीत उलटपक्षी भुजबळ-मुंडे तर शरद पवारांना विठ्ठल म्हणतात.

हे वाचलं का?

दुसरीकडे अजित पवारांची महत्वाकांक्षा

शिंदे सरकार आल्यापासून एकनाथ शिंदेंनी आपल्या महत्वाकांक्षेचा बाजार मांडला नाही. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांपेक्षा आपली लोकप्रियता जास्त असल्याची जाहिरातीचा अपवाद वगळल्यास भाजपला आव्हान देणं, साईडलाईन करणं, अधिकारक्षेत्राच्या बाहेर जाणं असं कधी शिंदेंनी केलं नाही.

हे ही वाचा >> भाजपने काय दिली होती ‘ऑफर’?; शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने राजकारणात भूकंप

अगदी मुख्यमंत्रिपदी शिंदे असूनही फडणवीस सुपर सीएम, किंवा भाजपचीच शिवसेनेपुढे कशी चालते असे अर्थ किंवा आरोप विरोधकांनी केले तरी शिंदेंनी त्याबाबत नाराजी कधीच चव्हाट्यावर आणली नाही, फडणवीसांसोबत परिणामी भाजपसोबत जुळवून घेतानाच शिंदे पाहायला मिळतात.

ADVERTISEMENT

पण अजित पवारांच्या महत्वाकांक्षा लपल्या नाहीत. दादा असो वा त्यांचा गट खुलेआमपणे ते मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा बोलून दाखवतात. मुंबई, पुणे अगदी नागपुरातही अजित पवार भावी मुख्यमंत्रीचे बॅनर लागतात. शिवाय अर्थ खातं असेल, पुण्याचं पालकमंत्रिपद असेल ह्यावर अजित पवार अडून बसतात.

ADVERTISEMENT

अर्थ खातं असो वा पुण्याचं पालकमंत्रिपद दोन्ही भाजपकडे पण वादाला फोडणी देण्यापेक्षा लोकसभेचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन भाजप सध्या या गोष्टींकडे कानाडोळा करत असावी.

शिवसेना नॅचरल अलायन्स, राष्ट्रवादी पॉलिटिकल अलायन्स

स्वत: देवेंद्र फडणवीसांनीच सांगितलंय की शिवसेना हा त्यांचा नैसर्गिक मित्र पण राष्ट्रवादीसोबत झालेली युती ही राजकीय मैत्री आहे. 2014 ची विधानसभा निवडणूक आणि 2019 ते 2022 जूनपर्यंतचा काळ सोडला तर तसं शिवसेना-भाजपला एकत्र नांदायची सवय आहे. त्यामुळे कुठे ताकद लावायची, कुठे कोण लढणार या गोष्टी दोन्ही पक्षांमध्ये क्लिअर होत्या.

पण अजित पवार गट सोबत आल्याने समीकरणं बदलणार आहेत. मूळात अजून ग्राऊंड लेव्हलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाला स्वीकारल्याचं अद्याप तरी दिसत नाहीए.

हे ही वाचा >> Aaditya Thackeray लोकसभा निवडणूक लढवणार?, India Today Conclave मध्ये सांगितला प्लॅन

गोपीचंद पडळकर-मोहित कंबोज यांनी अजित पवारांना डिवचल्याचं उदाहरण ताजं आहे. ज्या भाजप नेत्यांचा बेसच राष्ट्रवादीविरोधातला आहे त्यांना आता NCP सोबत नांदणं कठीण होऊन बसलं आहे. याशिवाय सरस्वती, संभाजी भिडेंवरची छगन भुजबळांनी वक्तव्य असो किंवा अमोल मिटकरी भाजपच्या हिंदुत्वाला बेगडी म्हणणं असो भाजपसाठी या गोष्टी अडचणीच्या आहेत.

त्यामुळे हे सगळं पाहता भाजपसाठी एकनाथ शिंदे हे विश्वासू, संयमी आणि सोयीचे ठरताना पाहायला मिळत आहेत पण तेच अजित पवारांचा आक्रमकपणा, धरसोड वृत्ती, नाराजी ही भाजपला डोकेदुखी ठरू शकते. पालकमंत्रिपदाच्या वाटपात पुणे जरी दिलं असलं तरी सातारा-रायगडची मागणी पूर्ण न करणं, भुजबळांना पालकमंत्रिपदच न देणं, ह्यातून भाजप दादांना सगळ्याच मागण्या पूर्ण होऊ शकत नाहीत, याचाच मेसेज देते का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT