Maharashtra Politics Live : ‘शरद पवारांनी भाजपसोबत सरकार बनवायचं ठरवलं आणि मग…’ अजित पवारांचं मोठं वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांसह अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांवर 2 जुलै रोजी शिक्कामोर्तंब झालं. अजित पवारांनी शरद पवारांना आव्हान देत बंड केले. आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा मिळवण्यासाठी अजित पवार गट तयारीला लागला आहे. त्यामुळे आता शरद पवार विरुद्ध अजित पवार ही लढाई कायद्याच्या पेचात अडकताना दिसत आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra politics news today : राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांसह अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांवर 2 जुलै रोजी शिक्कामोर्तंब झालं. अजित पवारांनी शरद पवारांना आव्हान देत बंड केले. आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा मिळवण्यासाठी अजित पवार गट तयारीला लागला आहे. त्यामुळे आता शरद पवार विरुद्ध अजित पवार ही लढाई कायद्याच्या पेचात अडकताना दिसत आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचंच नव्हे, तर देशाचं लक्ष्य मुंबईतील घडामोडींकडे लागलं आहे. (Maharashtra Politics News NCP meeting ajit pawar sharad pawar)
ADVERTISEMENT
Maharashtra Political Crisis Live News : काकांपेक्षा पुतण्याचं पारडं जड? कोणाला किती आमदारांचा पाठिंबा समजून घ्या…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कोणाचे वर्चस्व राहणार हे काळच सांगेल. परंतु सध्या काका शरद पवारांपेक्षा पुतणे अजित पवार याचं पारडं जड दिसत आहे. आजच्या (5 जुलै) बैठकीत अजित पवार आणि शरद पवार आपली ताकद दाखवत आहेत. या शक्तिप्रदर्शनात अजित पवारांची शरद पवारांपेक्षा भक्कम स्थिती दिसत आहे. दोन्ही गटांकडून राष्ट्रवादीच्या आमदारांना बैठकीला उपस्थित राहण्याची नोटीसही बजावण्यात आली होती. यावेळी अजित पवारांच्या बैठकीला 32 आमदार, 4 विधान परिषद सदस्य आणि 1 खासदार उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीला एकूण 14 आमदारांनी हजेरी लावली आहे. याशिवाय 3 विधान परिषद सदस्य आणि 4 खासदारही बैठकीला उपस्थित आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या आजच्या या बैठकीमुळे कुणाकडे किती आमदार समर्थक आहेत, हे स्पष्ट झालं.
‘शरद पवारांनी भाजपसोबत सरकार बनवायचं ठरवलं आणि मग…’ अजित पवारांचं मोठं वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर 5 जुलै रोजी दोन्ही गटांनी स्वतंत्र बैठक बोलावली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत MET वांद्रे येथे त्यांच्या गटातील नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर त्यांना संबोधित केले. यावेळी अनेक मोठमोठे दावे करत त्यांनी शरद पवारांबद्दलही मोठे खुलासे केले. अजित पवार म्हणाले की, ‘2004 मध्ये काँग्रेसपेक्षा जास्त आमदार असतानाही राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाची संधी गमावली. त्यावेळी काँग्रेसला मुख्यमंत्रिपद दिले नसते तर आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री राहिला असता. मला नेहमीच खलनायक बनवले जाते.’
हे वाचलं का?
पुढे अजित पवार मोठा दावा करत म्हणाले की, ‘2019 च्या निवडणुकीनंतर पवार साहेब, मी आणि प्रफुल्ल पटेल यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची एका मोठ्या उद्योगपतीच्या घरी भेट घेतली आणि सरकार स्थापनेबाबत सर्व काही ठरवले आणि नंतर काय झाले, हे सर्व तुम्हाला माहीत आहे. 2017 मध्येही शरद पवारांना भाजपसोबत सरकार बनवायचे होते. भाजपमधील 75 वर्षे वय असलेले नेतेही निवृत्त होतात, मात्र काही लोकांना हे समजत नाही. शरद पवार यांनी 2 मे रोजी राजीनामा दिला. सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करायचे ठरले. आम्ही स्वीकारले, पण मग काय झाले राजीनामा परत घेतला. तुम्ही पद सोडले नाही, तर राजीनामा का दिला? मी सुप्रिया सुळे यांना अनेकदा सांगितले की तुम्ही समजावून सांगा, पण सुप्रिया म्हणते की वडील खूप हट्टी आहेत. ही हट्टी वृत्ती काय हा प्रश्न आहे.’
‘बडव्यांना बाजूला करा अन् आम्हाला आशिर्वाद द्या’, भुजबळांची शरद पवारांना हाक
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आज (5 जुलै) महत्त्वाचा दिवस आहे. दोन्ही गटाच्या बैठका होत आहेत. अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांची बैठक मुंबईतील वांद्रे येथे MET येथे होत आहे. यावेळी बैठकीत शरद पवार यांच्यासह त्यांच्या गटाच्या नेत्यांवर छगन भुजबळ यांनी घणाघाती टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘तुरुंगातून आल्यावर मला आमिषं दाखवली. पण तरीही शरद पवारांसोबत आम्ही एकनिष्ठ राहिलो, पण आता हे का झालं? साहेब आमचे विठ्ठल पण त्यांना बडव्यांनी घेरलंय. साहेब बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला या. आम्ही गेलो ते तुमच्याभोवती बडवे जमले आहेत त्यांच्यामुळे,तुम्ही आवाज द्या, ही मंडळी तुमच्याकडे यायला तयार आहे. नागालँडमध्ये भाजपसोबत जायला परवानगी दिली तशी, आम्हालाही द्या. त्यांचा सत्कार केला आम्हालाही पोटाशी घ्या. आम्ही डिसक्वालिफाय होणार नाही, आम्हालाही कायदे कळतात, सगळी व्यवस्था केली आहे. घाबरायचं कारण नाही. आपण कार्यकर्ते आणि जनतेलाही न्याय देऊ.’ असे म्हणत भुजबळांनी जयंत पाटलांवर टीकास्त्र सोडले.’
ADVERTISEMENT
कुणाकडे किती आमदार?
अजित पवार यांच्या गटाकडून असा दावा केला जातोय की, त्यांना 40 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे. प्रफुल पटेल यांच्याकडून हे सातत्याने सांगितलं जातंय. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असं सांगत आहेत की, मंत्रिपदाची शपथ घेतलेले आमदार वगळता इतर सर्व शरद पवारांसोबत आहेत. त्यामुळेच आमदारांच्या आकड्यांचा हा गोंधळ संपलेला नाही.
ADVERTISEMENT
अजित पवारांच्या गटातील दोन आमदार आले शरद पवारांकडे
मुंबईतील वायबी सेंटरला राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होत आहे. तर मुंबईतील एमईटी येथे अजित पवार गटाची बैठक आहे. त्या बैठकीआधी अजित पवारांच्या गटातील दोन आमदार वायबी चव्हाण सेंटरला आले आहेत. देवेंद्र भुयार यांनीही शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. शिरुरचे आमदार अशोक पवार यांनीही आपण शरद पवारांसोबत असल्याचे जाहीर केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT