Vidhan Parishad Election 2024: 11 जागा, 12 उमेदवार... विधान परिषद निवडणुकीत आज कोणाचा होणार गेम?
MLC Election 2024 : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी तब्बल 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या सर्व उमेदवारांसाठी आज (12 जुलै) मतदान होत असून सर्वांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. मतदानाला सकाळी 9 वाजल्यापासून सुरूवात झाली आहे.
ADVERTISEMENT
MLC Election 2024 : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी तब्बल 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या सर्व उमेदवारांसाठी आज (12 जुलै) मतदान होत असून सर्वांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. मतदानाला सकाळी 9 वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. सायंकाळी 4 किंवा 5 वाजेपर्यंत या वेळेत मतदान पार पडेल. पण त्याआधी महायुती आणि महाविकास आघाडीचे सदस्य आपापल्या आमदारांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामागील कारण म्हणजे क्रॉस व्होटिंग आणि आमदार फुटीची भीती... (Maharashtra Vidhan Parishad Election 2024 11 seats 12 candidates Whose game will be played today in mlc election)
ADVERTISEMENT
विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने 9 उमेदवार उभे केले आहेत. तर विरोधी महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी त्यांच्या हॉटेलवरील राजकारणाची प्रचंड चर्चा झाली. विधानपरिषद निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी ठाकरे, शिंदे, अजित पवार आणि भाजपनं खबरदारी म्हणून त्यांच्या आमदारांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये ठेवलं होतं.
आता या विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होणार का?, नेमका कोणाचा गेम होणार? अशाप्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत.
हे वाचलं का?
हेही वाचा : Mumbai Local Train : मुंबईत मुसळधार पावसाचा धुमाकूळ, मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत!
महाराष्ट्रातील ही विधानपरिषद निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. कारण लोकसभा निवडणुकीनंतर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील ही पहिलीच लढत आहे. अशा परिस्थितीत महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांना पराभूत करण्यासाठी वेगवेगळ्या युक्ती लढवतील.
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीला मोठा धक्का
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागांपैकी काँग्रेसने सर्वाधिक 13 जागा जिंकल्या आहेत, तर भाजपला 9 जागा मिळाल्या आहेत आणि शिवसेना (UBT) म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या पक्षालाही 9 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने 8 जागा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 तर अजित पवारांच्या NCP ला फक्त 1 जागा जिंकता आली आहे. तर एक जागा सांगलीतून अपक्ष उभे राहिलेले विशाल पाटील यांच्या खात्यात गेली आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या आणि NDA च्या खात्यात फक्त 17 जागा राहिल्या.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Vidhan Parishad Election: कोणासोबत होणार दगाफटका? आमदारांची मतं कोणाला बनवणारं आमदार?
निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात मोठी राजकीय खेळी
लोकसभा निकालामुळे मोठी उलथापालथ झाली आहे. कारण निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी सारख्या मोठ्या पक्षात बंडखोरी झाली होती. शिवसेना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात विभागली गेली तर राष्ट्रवादीतही फूट पडल्याने. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पक्ष विभागला गेला. पक्ष चिन्हावरूनही मोठा गदारोळ माजला होता.
ADVERTISEMENT
पण लोकसभे निवडणूक 2024 च्या निकालानंतर उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या पुढे गेले आणि अजित पवार यांचा, काका शरद पवार यांच्याकडून दारुण पराभव झाला आणि भाजपचेही नुकसान झाले. आता महायुतीमध्ये एक जागा जिंकणारी राष्ट्रवादी काँग्रेस निशाण्यावर आली आहे.
विधानपरिषद निवडणुकीत असा आहे आकड्यांचा खेळ...
आता जर आपण विधानपरिषद निवडणुकीतील आकड्यांच्या खेळाबद्दल बोललो तर, काँग्रेस आणि भाजप वगळता कोणत्याही पक्षाकडे आपल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी संख्याबळ नाही. अशा स्थितीत अजित पवारांपासून एकनाथ शिंदेंपर्यंत आणि शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत कोणाच्या पक्षाला धक्का बसेल आणि कोण आपल्या आमदारांना राखून ठेवेल, हे पाहावं लागेल.
हेही वाचा : Pooja Khedkar: IAS पूजा खेडकरांचं ते WhatsApp चॅटच आलं समोर, नेमकं काय आहे यात?
विधानपरिषद निवडणुकीत कोणासोबत होणार गेम?
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक चांगलीच रंगणार आहे, कारण 12 जागांसाठी महायुतीचे 9 उमेदवार आणि महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवार जिंकतील की महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार विजयी होतील हे पाहाणं रंजक असेल. कारण विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत.
महायुतीकडून भाजपचे 5 उमेदवार, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे दोन उमेदवार आणि अजित पवार गटाचे दोन उमेदवार या लढतीत उभे आहेत. तर, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे एक उमेदवार, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे एक उमेदवार तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना उमेदवारी न देता पाठिंबा दिला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT