Uddhav Thackeray: 'एक तर तू राहशील नाहीतर मी तरी...', ठाकरेंचं फडणवीसांना खुलं आव्हान
Uddhav Thackeray challenge to Devendra Fadnavis: 'सगळं सहन करून मी जिद्दीने उभा राहिलोय.. एक तर तू राहशील नाहीतर मी तरी राहील.' असं खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray: मुंबई: विधानसभा निवडणुका जसजशी जवळ येत आहे तसतसं महाराष्ट्रातील राजकारण तापू लागलं आहे. त्यातच आज (31 जुलै) मुंबई शिवसेना (UBT) चा पदाधिकारी मेळावा पार पडला. ज्यामध्ये उद्धव ठाकरेंनी अत्यंत घणाघाती असं भाषण केलं. यावेळी त्यांनी थेट भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलं आव्हान दिलं. 'सगळं सहन करून मी जिद्दीने उभा राहिलोय.. एक तर तू (देवेंद्र फडणवीस) राहशील नाहीतर मी तरी राहील.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आगामी निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे.
उद्धव ठाकरेंचं घणाघाती भाषण जसंच्या तसं...
'आता मशालीचा प्रचार घरोघरी करा.. कारण या चोर कंपनीने आपल्या शिवसेनाप्रमुखांचा फोटो लावला.. आणि बाळासाहेबांचं धनुष्यबाण.. काही जणांनी सांगितलं की, आम्हाल तर तुम्हालाच मत द्यायचं होतं. अमराठी लोकांनी हे सांगितलं.. पण आम्ही चुकून धनुष्यबाणाला मत दिलं. हे आहे थोडी गोंधळाची परिस्थिती आहे.'
'एकतर मशालीला मान्यता द्यावी यासाठी आपण निवडणूक आयोगाला पत्र दिलं आहे. त्याच्याशी साधर्म्य साधणारं चिन्ह मतपत्रिकेवर असू नये याबाबत देखील त्यांना सांगण्यात आलं आहे. बघू त्याचा पण निकाल येईल 60-65 वर्षांनी.. तोपर्यंत घरोघरी मशाल पोहचली पाहिजेच.'
'अगदी मराठी असो अमराठी असो.. मुस्लिम लोकं, ख्रिश्चन लोकं ही आपल्यासोबत खूप मोठ्या प्रमाणात आली आहेत. आपलं हिंदुत्व वेगळं आहे आणि यांचं हिंदुत्व मात्र वेगळं आहे. यांचं हिंदुत्व म्हणजे तोडा-फोडा आणि राज्य करा..'