Mahavikas Aghadi Meeting: मविआ वज्रमुठ पुन्हा आवळणार, बैठकीत काय ठरलं?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

महाविकास आघाडीच्या नेत्यांची गरवारे क्लबमध्ये सुरु असललेली बैठक संपली आहे. आगामी मुंबईतल्या इंडिय़ाच्या बैठकीबाबतच्या नियोजनावर या बैठकीत चर्चा होणार होती. या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्रात पुन्हा वज्रमुठ सभा सुरु करण्याचा निर्धार केला. याबाबतची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही. मात्र पावसाळा संपल्यानंतर लगेचच संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू अशी माहिती नेत्यांनी बैठकींनंतर पत्रकारांना दिली. यासह शिंदे-फडणवीस आणि अजित पवार सरकारला कसे कोंडीत पकडायचे यावर देखील या बैठकीत चर्चा झाली.(mahavikas aghadi meeting end what strategies ncp shivsena congress decides)

महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीला शिवसेना (UBT) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार कपिल पाटील, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांची प्रमुख उपस्थिती होती. यासह अनिल देशमुख, राजेश टोपे, रोहित पवार,जितेंद्र आव्हाड, प्रजक्त तनपुरे, शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील आदी नेत्यांची उपस्थिती होती.

हे ही वाचा : Nitin Desai: नि:शब्द शोकांतिका! धनुष्यबाण बनवला अन् मधोमध उभं राहून घेतला गळफास

मविआच्या या बैठकीला उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. ज्यांना राष्ट्रपिता मान्य नाही, संविधान मान्य नाही, असे गुरुजी त्यांच्या शिष्यांना चालतात का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी संभाजी भिडे प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांना लगावला. तसेच आता सत्ताधारी कशी सत्ता राबवत आहेत यावर होऊन जाऊ दे चर्चा, असे आवाहन देखील त्यांनी नेत्यांना केले. तसेच जनतेमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचंड रोष आहे. त्यामुळे आपण जर अशा परिस्थितीत एकत्र राहिलो तर आपल्या जागा निश्चितपणे वाढतील, असा विश्वास देखील उद्धव ठाकरे यांनी तिन्ही पक्षांमध्ये भरला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आपण सर्वजण वेगवेगळे दौरे करतच आहोत. मात्र पावसाळ्यानंतर पुन्हा एकदा आपण एकत्रित महाराष्ट्र पिंजून काढायला हवा असे देखील उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सुचवले आहे. मुंबई प्रमाणेच नाशिक, नागपूर, पुणे, औरंगाबाद अशा विभागवार महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायला हव्यात, असे देखीव उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : Caste Based Census : मंडल विरुद्ध कमंडल; लोकसभा 2024 ची लढाई अशी बदलणार

या बैठकीनंतर विजय वड्डेटीवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. बैठकीत पुढील वालचाल, पुढील दिशा ठरवली गेली आहे, तीनही पक्षाने महाराष्ट्रात फिरायचं, तिन्ही पक्षाच्या जिल्हा स्तरावर बैठका कशा लावल्या जातील यावर चर्चा झाली आहे. पक्ष फोडणाऱ्यांना आता जनता फोडल्याशिवाय राहणार नाही..आमच्या मताचा अनादर केला गेला, जनतेला हे रूजलेल नाही, जनतेच्या पचनी पडलं नाही. त्यामुळे जनतेमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात रोष असल्याचे वड्डेटीवार यांनी म्हटले आहे. आम्ही तिघे एकत्र मिळून पुढे गेलो तर लोकसभेला आणि विधानसभेला ताकद मिळेल. तीनही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र दौरा करायचा, यावर चर्चा झाली. वज्रमुठच्या सभा पावसाळा संपल्यानंतर होतील अशी माहिती देखील विजय वड्डेटीवार यांनी दिली.

ADVERTISEMENT

येत्या 15 ऑगस्टनंतर महाविकास आघाडीच्या दौरे सुरु होणार आहेत. वज्रमुठ सभा होणार, तीन सभा झालेल्या आहेत, आता आणखीण होणार आहेत. महाविकास आघाडी एकत्रितरित्या महाराष्ट्राचे दौरे करणार आहे. काही जण गैर समजात असतील की फोडले तोडले म्हणून ताकद कमी होईल पण आम्ही आणखीण ताकदीने लढू असा विश्वास ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT