दसरा मेळाव्यातून मनोहर जोशींना जावं लागलं होतं निघून, नेमकी घटना काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Manohar Joshi
uddhav thackeray
social share
google news

Manohar Joshi : शिवसेना आणि दसरा मेळावा हे एक अतूट नाते आहे. शिवसेनेचा (Shiv sena) दसरा मेळावा अनेक कारणांनी चर्चेत असतो. मात्र बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे निधन झाल्यानंतर 2013 मध्ये शिवसेनेचा झालेला दसरा मेळावा (Dasara Melawa) अनेक घटनांनी चर्चेत राहिला. कारण बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर तो पहिलाच दसरा मेळावा होतो आणि त्याच वेळी शिवसेनेच ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी उघड उघड पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंविरोधात (Uddhav Thackeray) भूमिका घेतली आणि तिथेच खरी ठिणगी पडली होती. 

कडवट शिवसैनिक तरीही...

त्यानंतर काही दिवसांनी दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या मेळाव्याला मनोहर जोशी आले मात्र कार्यक्रम सुरू झाल्यानंतर उशिराने ते आले होते. शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री, कडवट शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्ती अशी ओळख असलेल्या मनोहर जोशींना मात्र त्यादिवशी धक्कादायक अनुभवला सामोरे जावं लागले होते. 

स्मारकाला दिरंगाई का?

बाळासाहेब ठाकरे यांचे निधन 2012 मध्ये झाल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मारकाचा मुद्दा चर्चेला आला. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला दिरंगाई होत असल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यावरूनच मनोहर जोशी यांनी त्यावर टीका केली आणि उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

स्मारकाचा प्रश्न

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावरून उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते म्हणाले की, 'जर आज बाळासाहेब असते तर त्यांच्या वडिलांच्या स्मारकाला इतका वेळ लागला नसता' अशी खोचक टीप्पणी केली. त्यावरून नंतर दसरा मेळाव्यातील मनोहर जोशींच अपमान नाट्य घडलं होते.

जोशींची जाहीर भूमिका

मनोहर जोशींनी उघड उघड भूमिका घेतल्यानंतर मात्र शिवसैनिकांनीही त्यांच्याबाबती नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली.  त्या नाराजीचे पडसाद नंतर दसरा मेळाव्यात पडले. शिवसेनेच्या 48 व्या दसरा मेळाव्यासाठी मनोहर जोशी उद्धव ठाकरे यांच्यानंतर व्यासपीठावर आले आणि 'मनोहर जोशी चले जाव', 'मनोहर जोशी हाय हाय', अशा घोषणा शिवसैनिकांनी द्यायला सुरुवात केली. 

ADVERTISEMENT

मनोहर जोशी हाय हाय

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या विरोधात भर दसरा मेळाव्यात 'मनोहर जोशी चले जाव', 'मनोहर जोशी हाय हाय' अशा घोषणा देण्यात आल्याने जोशींनीही माघार घेत त्यांनी स्टेजवरून निघून जाण्याचा निर्णय घेतला. मनोहर जोशी निघून गेल्यानंतर मात्र त्या घटनेची जोरदार चर्चा झाली. 

ADVERTISEMENT

माझा शिवसेनेवर राग नाही


दसरा मेळाव्यातून निघून जावं लागलं असलं तरी नंतर मनोहर जोशींनी ,'गैरसमजातून हा प्रकार घडला आहे. माझा शिवसेनेवर राग नाही. कधीही नव्हता आणि आताही नाही.'असं सांगत त्यांनी त्या घटनेवर पडद्या टाकण्याचा प्रयत्न केला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT